Join us  

आली लहर, केला कहर...! चक्क बाथ्रोबमध्ये एअरपोर्टवर पोहोचला अभिनेता झीशान खान; पाहून सारेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 3:47 PM

सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकची चर्चा सर्रास होते. तूर्तास चर्चा आहे ती ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता झीशान खानच्या एअरपोर्ट लुकची.

ठळक मुद्देसध्या झीशानच्या या एअरपोर्ट व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी झीशानच्या हिंमतीची दाद दिली आहे तर काहींनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकची चर्चा सर्रास होते. तूर्तास चर्चा आहे ती ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता झीशान खानच्या (Zeeshan Khan) एअरपोर्ट लुकची. होय, छोट्या पडद्यावरच्या या लोकप्रिय अभिनेत्याने काय केले तर चक्क बाथ्रोब घालून गोवा ते मुंबई विमान प्रवास केला. त्याचा हा अवतार पाहुन सगळेच हैराण झाले.  (Kumkum Bhagya actor Zeeshan Khan reached airport in bathrobe)बाथ्रोब घालून झीशान विमानतळावर पोहोचला. तसाच प्रवास केला. याचा एक व्हिडीओ त्याने स्वत: त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत तो त्याच्या काही मित्रांसोबत आहे.  एअरपोर्टवरचे लोक त्याच्याकडे हैराण होऊन बघत आहेत. बाथ्रोब घालून प्रवास करणे शक्य नाही, असे एअरपोर्ट अधिकारी त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसतेय.  

झीशानच्या मते, बाथ्रोबमध्ये प्रवास करण्यात काहीही गैर नाही. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही भूमिका मांडली. ‘आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे, असे माझे मतआहे. सार्वजनिक ठिकाणी बाथ्रोब घालणे अयोग्य आहे? हे कोणी ठरवले. मला यात काहीही चुकीचे वाटत नाही तर तुम्हाला का वाटायला हवे? मी बाथ्रोबमध्ये कम्फर्टेबल आहे तर तुम्हाला काय अडचण आहे? मी माझ्या अटींवर जगणारा माणूस आहे. कारण माझ्यासाठी एकच आयुष्य आहे आणि ते माझ्या पद्धतीने, माझ्या मताने उपभोगण्यासाठी मी इथे आहे. ’ असे झीशान म्हणाला.

सध्या झीशानच्या या एअरपोर्ट व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी झीशानच्या हिंमतीची दाद दिली आहे तर काहींनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यार झीशान, तू क्या क्या करता रहता है? खरंच तू वेडा आहेस, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

 

टॅग्स :टेलिव्हिजन