Join us

कृतिका म्हणतेय, ‘मी इंटिमेट सीन्स देणे नवºयाला आवडत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:25 IST

‘झांसी की रानी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कृतिका सेंगरने सांगितले, की तिचा नवरा निकितन धीर याला तिचे पडद्यावर ...

‘झांसी की रानी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कृतिका सेंगरने सांगितले, की तिचा नवरा निकितन धीर याला तिचे पडद्यावर कोणत्याही अभिनेत्यासोबत इंटीमेट होणे पसंत नाही. कृतिका सध्या ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत लीड रोलमध्ये झळकत आहे. या मालिकेत शरद मल्होत्रा कृतिकाच्या नवºयाच्या भूमिकेत असून, दोघांची आॅनस्क्रि न केमिस्ट्री झकास जमली आहे. मात्र यामुळे निकितन हर्ट होत असल्याचे तिला वाटत आहे.कृतिकाने निकितनच्या पझेसिवनेसविषयी सांगताना म्हणाली की, होय हे खरे आहे. त्याला पडद्यावर माझे कुठल्याही अभिनेत्यासोबत इंटीमेट होणे पसंत नाही. त्यामुळे माझा हा नेहमीच प्रयत्न असतो की, अशा प्रकारचे प्रसंग शक्यतो टाळले जावेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडद्यावर तो मला सतत रडताना बघू शकत नाही. पण डेली सोपमध्ये हसणे-रडणे हा ड्राम खूप असतो. अशातही निकितन माझ्या एखाद्या गोष्टीने हर्ट होईल, असे कुठलेच काम करण्याची माझी इच्छा नाही. त्याचबरोबर निकितन जेव्हा एखाद्या अभिनेत्रींसोबत रोमान्स सीन्स करतो, तेव्हा मला अनकम्फर्टेबल वाटत असल्याचे ती म्हणतेय. खरं तर एखाद्या गोष्टीसाठी आपण कधीही नाही म्हणू नये. पण आपले नाते पर्सनल ठेवायला हवे. नात्याला पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणू नये. जर एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजेस आमची केमिस्ट्री स्ट्राँग नाही किंवा त्याची केमिस्ट्री इतर कुणासोबत चांगली आहे, असे म्हणाले, तर ते मी सहन करु  शकणार नाही, असेही कृतिका म्हणते. कृतिका-निकितन ३ सप्टेंबर २०१४ रोजी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. निकितनने शाहरु ख खान-दीपिका पदुकोण स्टारर  ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमात थंगाबलीच्या भूमिकेत झळकला होता. त्याची ही भूमिका खूप गाजली होती. सध्या तो  ‘नागार्जुन : एक योद्धा’ या मालिकेत झळकत आहे.