किंग खानने केले मराठी चित्रपटाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 04:41 IST
बॉलीवुड कलाकारांचे मराठी चित्रपटाकडे पडणारे पाउल हे नक्कीच मराठी इंडस्ट्री भरारी घेत आहे
किंग खानने केले मराठी चित्रपटाचे कौतुक
बॉलीवुड कलाकारांचे मराठी चित्रपटाकडे पडणारे पाउल हे नक्कीच मराठी इंडस्ट्री भरारी घेत आहे. याची यशस्वी पावतीच म्हणावी लागेल. विदया बालन, सलमान खान, अक्षय कुमार, नर्गिस फकरी यांनी या मराठी इंडस्ट्रीत पाउल टाकलेच आहे. आता, तर थेट बॉलीवुडचा किंग खान शाहरूख खान म्हणाला, मराठी चित्रपट देखील आता, बॉलीवुड चित्रपटांप्रमाणे बनत आहे. असे म्हणून वृदांवन या नवीन चित्रपटाचे कौतुक देखील केले. हा चित्रपट दाक्षिणात्य दिग्दर्शक टी.एल.व्ही प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाची कोरिओग्राफी गणेश आचार्या यांनी केली आहे. संगीत अमितराज यांचे आहे. तर राकेश बापट, पूजा सावंत, महेश मांजरेकर, अशोक सराफ, मोहन जोशी,शरद पोंक्षे अशा दिग्गज कलाकारांचा देखील या चित्रपटात समावेश आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.