खूशखबर: Ye Hai Mohabbatein फेम अनिता हंसनंदानीच्या घरी आला छोटा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 15:29 IST
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारी आणि 'ये है मोहब्बते' फेम अनिता हंसनंदानी सध्या खूप खूष आहे.अनिताला ...
खूशखबर: Ye Hai Mohabbatein फेम अनिता हंसनंदानीच्या घरी आला छोटा पाहुणा
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करणारी आणि 'ये है मोहब्बते' फेम अनिता हंसनंदानी सध्या खूप खूष आहे.अनिताला मिळणा-या नवनवीन संधीमुळे ती खूष नसून तिच्या घरी एक छोटा पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे ती आनंदीत असल्याचे दिसतेय. 2013 साली रोहित रेड्डीसह अनिताने लग्न केले होते. आता 2017 साली तिच्या घरी एक क्युट पाहुणा आला आहे. रोहितने अनिताला एका पब बाहेर बघितले होते त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. या छोट्या पाहुण्याच्या आगमनामुळे घरांतही प्रसन्न वातावऱण पाहायला मिळतंय. त्यामुळे अनिताने तिच्या कुटुंबियांप्रमाणेच या छोट्या पाहुण्याचीही जबाबदारी आली आहे.अनिताचा जास्त वेळ छोट्या पाहुण्याचे लाड पुरवण्यातच जात असतो.या छोट्या पाहुण्याचे अनिताने फोटोही सोशलमीडियावर शेअर केले आहेत.होय,आता तुम्हाला वाटले असेल की तिने एका बाळाला जन्म दिला असावा, म्हणून ती सध्या खूप खुष असेल तर असे नसून तिच्या घरी एक छोटे कुत्र्याचे पिल्लु आले आहे.अनिताला प्राण्यांची खूप आवड असल्यामुळे सध्या ती या पिल्लुसह मजा मस्ती करताना दिसतेय.अगदी आईप्रमाणे ती त्याची काळजी घेताना दिसतेय. त्याचे लाड पुरवताना दिसतेय.त्यामुळे या पिल्लुमुळे एक नवीन जबाबदारी आल्यासारखे वाटत असून, मी एका आईसारखीच त्याची काळजी घेत आहे.अनिताने तिचा आनंद तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर फोटो आणि एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.