सिनेमा असो किंवा मालिका, एखाद्या भूमिकेसाठी कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. भूमिकेला न्याय देण्यासाठी कलाकार काहीही करण्यासाठी तयार असतात. भूमिकेतील परफेक्शनसाठी हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असल्याचे आपण वारंवार पाहिलं आहे. कधी हे कलाकार तासनतास जिममध्ये घाम गाळतात. दुसरीकडे अभिनेत्री भूमिकेतील परफेक्शनसाठी किंवा झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत करतात, डायट करतात हेसुद्धा आपण पाहिले आहे. असाच काहीसा प्रयत्न कॉमेडी क्वीन भारती सिंह करताना दिसत आहे. (Also Read:'खतरों के खिलाडी' च्या 9व्या सिझनमध्ये 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी!)
भारती जीममध्ये इतका घाम गाळण्याचे कारणही तसे खास आहे. 'खतरों के खिलाड़ी'चे 9वे सिझनमध्ये भारती एंट्री करणार आहे.या शोमधील सगळे खतरनाक स्टंट करताना भारती कुठे कमी पडू नये यासाठी ती मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.नेहमीच कॉमेडी अंदाजात दिसणारी भारती 'खतरों के खिलाड़ी'शोमध्ये वेगवेगळी आव्हानं स्विकारताना दिसणार आहे.
गेल्या काही दिवसापासून या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी काही दिवसांपूर्वीच जाहिर झाली होती.विशेष म्हणजे या शोमध्ये भारती सिंहबरोबर तिचा पती हर्ष लिंबाचिया आपले नशीब आजमवताना दिसणार आहे.'बिग बॉस 11'मुळे प्रकाशझोतात आलेले विकास गुप्ता आणि बंदगी कालरासुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहे.नेहीमप्रमाणेच रोहित शेट्टी या सिझनला होस्ट करणार असल्यामुळे रसिकांमध्ये या शोसाठी कमालीची उत्सुकता वाढली आहे.
'खतरों के खिलाडी' 8 व्या सिझनमध्ये गीता फोगाट, लोपामुद्रा राऊत,मनु पंजाबी, मनवीर गुर्जर, करन वाही, शांतनु माहेश्वरी, शिवानी डांडेकर, निया शर्मा, हिना खान, रवि दुबे, मोनिका डोगरा, शाइनी दोशी, रित्विक धन्जानी हे स्पर्धक शोमध्ये सहभागी झाले होते.हिना खानची लोकप्रियता पाहाता हिना खानच 'खतरों के खिलाडी 8वे' सिझन जिंकणार असे सा-यांनाच वाटत होते.मात्र हिना खान नाही तर शांतनु माहेश्वरीने हे 8वे पर्व जिंकले होते.या कार्यक्रमाची कंसेप्ट पाहाता प्रत्येक कंटेस्टंटला खतरनाक स्टंट दिले जातात.एरव्ही आपल्या कॉमेडीने,भूमिकेमुळे मनोरंजन करणारे कलाकार या शोमध्ये असे अनेक एक से बढकर एक स्टंट करत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत असतात.खतरो के खिलाडींचा 8 वा सिझन स्पेनमध्ये पार पडला. आता 9 वा सिझन युरोपमध्ये होणार आहे.या नव्या सिझनचा विजेता ठरण्यासाठी प्रत्येकजण अहोरात्र मेहनत करताना दिसत आहे.