'खतरों के खिलाडी' च्या 9व्या सिझनमध्ये 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 11:46 AM2018-07-14T11:46:09+5:302018-07-14T11:50:49+5:30

रोहित शेट्टी पुन्हा एकदा नव्या जोमात 'खतरों के खिलाडी'चे 9वे सिझन घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसंपासून या नवव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या.

contestants final list of khatron ke khiladi season 9 | 'खतरों के खिलाडी' च्या 9व्या सिझनमध्ये 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी!

'खतरों के खिलाडी' च्या 9व्या सिझनमध्ये 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी!

googlenewsNext

रोहित शेट्टी पुन्हा एकदा नव्या जोमात 'खतरों के खिलाड़ी'चे 9वे सिझन घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसंपासून या नवव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहिर झाली आहे. 

'झलक दिखला जा' या डान्स शोमधून सर्व प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी शमिता शेट्टी या शोमध्ये सहभागी होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले जोडपे म्हणजेच कॉमेडिकिंग भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया हे दोघेही या शोमध्ये आपले कसब आजमवताना दिसणार आहेत.

'बिग बॉस 11'मधून नावारूपाला आलेला विकास गुप्तासुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहे.

'बिग बॉस 11'मध्ये गाजलेली सदस्य बंदगी कालराही 'खतरों के खिलाडी'चा हिस्सा बनणार आहे. 

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौरही शोमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे.

गायक आणि अनेक रिअॅलिटी शो होस्ट केलेला आदित्य नारायणही या शोमध्ये आपल्या हटके अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'दिल से दिल तक'मधील जास्मिन भाटीयाही रोहितने दिलेल्या आगळ्यावेगळ्या टास्कला सामोरी जाताना दिसणार आहे.

'नामकरण' फेम जाइन इमामसुद्धा या शोमध्ये सहभागी होणार आहे.

'बहू हमारी रजनीकांत' आणि 'एंटरटेनमेंट की रात'मध्ये दिसलेली रिद्धिमा पंडित या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे.

'ये हैं मोहब्बतें' शोमधून आपल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारा एली गोनीही या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे.

'डान्स इंडिया डान्स'मध्ये दिसलेला डान्सर पुनीत पाठकही आता संकंटांचा सामना करतना दिसणार आहे.

Web Title: contestants final list of khatron ke khiladi season 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.