Join us  

५२ व्या वर्षी नवी जबाबदारी.. केदार शिंदेंची खास पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:28 PM

केदार शिंदेंनी सोशल मीडियावर खास पोस्ट केलीय जी चांगलीच चर्चेत आहे

२०२३ मध्ये 'बाईपण भारी देवा' सिनेमातून प्रेक्षकांचं प्रेम मिळवणारे दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. (Kedar Shinde) केदार शिंदेंनी आजवर 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा', 'ह्यांचा काही नेम नाही', 'महाराष्ट्र शाहीर' अशा विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. केदार शिंदेंचे सिनेमे म्हणजे हमखास मनोरंजनाची गॅरंटी, हे लोकांना माहित असतं. अशातच केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका खास गोष्टीची माहिती सर्वांना दिलीय. 

केदार शिंदे हे कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड झाले आहेत. ही नवी जबाबदारी स्वीकारल्यावर केदार चॅनलवर पहिली मालिका घेऊन येत आहेत. त्या मालिकेचं नाव 'इंद्रायणी'. या मालिकेचा प्रोमो शेअर करतानाच केदार लिहीतात, "वयाच्या ५२व्या वर्षी.. मी एक नवी जबाबदारी स्वीकारली.. Colors Marathi Head of programming.. हे सगळं तुमच्या प्रेमाने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने शक्य झालं. पुन्हा नव्या कलाकृतीचं टेन्शन आहेच.. ही नवी कलाकृती माझ्या Colors Marathi टीमच्या मदतीने सादर होतेय. त्याचा हा पहिला टिझर.. नक्की कळवा.. कसा वाटतोय ते."

 

'इंंद्रायणी' मालिकेच्या प्रोमोमधून छोट्या मुलांचं निरागस भावविश्व उलगडताना दिसतंय. 'जीच्या निरागस प्रश्नांनी, तुम्ही आला होतात मेटाकुटीला.. लोभस.. मस्तीखोर.. अवखळ इंदू लवकरच येत आहे तुमच्या भेटीला..', असं कॅप्शन देत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय. या मालिकेत कोणते लोकप्रिय कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान प्रोग्रामिंग हेड झाल्यावर या नवीन मालिकेसाठी केदार शिंदे उत्सुक आहेत.

टॅग्स :केदार शिंदेकलर्स मराठी