Join us  

KBC 11 : पंधरा वर्षांच्या असताना आठ जणांनी केला होता बलात्कार, सुनीता यांची आपबिती ऐकून अमिताभ झाले सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 7:53 PM

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुनीता बोलताना दिसत आहे की, त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी आठ लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता.

ठळक मुद्देकौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुनीता बोलताना दिसत आहे की, त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी आठ लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. हे ऐकून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन सुन्न झाले.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक आठवड्यात आपल्याला स्पेशल एपिसोडमध्ये समाजकार्य करणाऱ्या काही खास लोकांना भेटायला मिळते. यंदाच्या आठवड्यात समाजसेविका सुनीता कृष्णन या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा प्रोमो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुनीता बोलताना दिसत आहे की, त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी आठ लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. हे ऐकून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन सुन्न झाले. यावर काय बोलायचे हेच त्यांना काही क्षण सुचत नव्हते. सुनीता काही वर्षांपासून एक एनजीओ चालवत असून लैंगिक तस्कारीच्या शिकार झालेल्या मुलींच्या-महिलांच्या पुर्नवसनासाठी त्या काम करतात. त्यांनी आजवर 22 हजारांहून अधिक मुलींची तस्करीतून मुक्तता केली आहे. त्यांच्या या कामासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. 

या प्रोमोमध्ये त्या हे देखील बोलताना दिसत आहेत की, त्यांच्यावर आतापर्यंत 17 वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. मात्र या हल्ल्यांना किंवा मरणाला त्या घाबरत नाहीत. माझा श्वास सुरू असेपर्यंत मी या मुलींसाठी काम करणार असे देखील त्या या प्रोमात बोलताना दिसत आहेत.

सुनीता या केवळ आठ वर्षांच्या असताना त्या दिव्यांग मुलांना डान्स शिकवत असत. त्यानंतर त्या 12 वर्षांच्या झाल्याने त्यांनी झोपडपट्टीमध्ये शाळा सुरू केली होती. त्या 15 वर्षांच्या असताना त्यांनी दलित वर्गातील लोकांसाठी साक्षरता अभियान सुरू केले. पुरुष प्रधान समाजात एका महिलेने केलेला हस्तक्षेप त्यावेळी लोकांना आवडला नव्हता. त्यांच्यावर आठ लोकांनी बलात्कार केला होता. एवढेच नव्हे तर त्यांना प्रचंड मारहाण देखील करण्यात आली होती. यात त्यांच्या कानाला दुखापत झाल्याने त्यांची ऐकण्याची शक्ती कमी झाली. सुनीता यांच्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडल्यानंतरही त्यांनी आपले हे समाजसेवेचे काम करणे बंद केले नाही. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन