Join us  

अखेर KBC मध्ये जिंकलेल्या पैशातून इतकी मोठी रक्कम का कापली जाते, जाणून घ्या गणित?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 10:15 AM

Kaun Banega Crorepati: केबीसी कार्यक्रमात जिंकलेली रक्कम स्पर्धकांसाठी स्पेशल इन्कम असते. त्यासाठी करात कोणतीही सवलत दिली जात नाही

मुंबई – कौन बनेगा करोडपती(Kaun Banega Crorepati) हा टेलिव्हिजनमधील सर्वात प्रसिद्ध शो आहे. मागील २ दशकापासून मोठ्या संख्येने प्रेक्षक केबीसी(KBC) पाहत आले आहेत. अनेकांनी या शोमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला आहे. महानायक अमिताभ बच्चन हा शो होस्ट करतात. केबीसीमध्ये स्पर्धकांनी लाखो-करोडो रुपये जिंकले आहेत. पण तुम्हाला माहित्येय का केबीसीमध्ये जिंकलेल्या स्पर्धकाच्या हातात नेमकी किती रक्कम दिली जाते? आज आम्ही त्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

केबीसीमध्ये स्पर्धक जितकी रक्कम जिंकतो त्यातील मोठा हिस्सा कराच्या स्वरुपात वजा केला जातो. म्हणजे जवळपास एक तितृयांश रक्कम करात जाते. नेमकं केबीसीमध्ये जिंकलेल्या रक्कमेचं गणित काय हे जाणून घेऊया. इन्कम टॅक्स(Income Tax) कलम १९४B नुसार केबीसी स्पर्धकाला जिंकलेल्या रक्कमेपैकी ३० टक्के कर भरावा लागतो. त्याचा अर्थ जर कुणी केबीसीत १ कोटी जिंकत असेल तर त्याच्या रक्कमेतून थेट ३० लाख रुपये कर आकारणी केली जाते. त्याशिवाय सेसही भरावा लागतो.

KBC विजेत्याला किती कर भरावा लागतो?

केबीसी कार्यक्रमात जिंकलेली रक्कम स्पर्धकांसाठी स्पेशल इन्कम असते. त्यासाठी करात कोणतीही सवलत दिली जात नाही. जर कुणी बक्षिसात १० लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जिंकली असेल तर त्यावर सरचार्जही भरावा लागतो. जिंकलेल्या रक्कमेवर १० टक्के सरचार्ज द्यावा लागतो. त्याशिवाय एज्युकेशन सेस आणि हायर एज्युकेशन सेसही द्यावा लागतो. जिंकलेल्या रक्कमेतून कर कापणं त्याच संस्थेची जबाबदारी असते ज्यांच्याकडून व्यक्तीने रक्कम जिंकली आहे.

१ कोटी जिंकले तर हातात किती रक्कम मिळते?

जर कौन बनेगा करोडपती या स्पर्धेत कुठल्याही स्पर्धकाने १ कोटी जिंकले तर त्यातील ३० टक्के कर भरावा लागतो. त्यानंतर ३० टक्के करावर १० टक्के सरचार्ज आकारला जातो. म्हणजे ३० लाख रुपयांवर १० टक्के ३ लाख रुपये द्यावे लागतात. त्यानंतर ४ टक्के सेस लावला जातो. ३० लाख रुपयांवर ४ टक्के म्हणजे १ लाख २० हजार. म्हणजे एकूण कर होतो ३० लाख रुपये, सरचार्ज ३ लाख आणि से १ लाख २० हजार रुपये. ही रक्कम जोडून ३४ लाख २० हजार रुपये होतात. त्याशिवाय १-२ हिडन चार्जही द्यावा लागतो. म्हणजे केबीसीत कुणी १ कोटी जिंकले तर त्याच्या हातात केवळ ६५ लाख रुपये मिळतात.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन