Join us  

KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

By अमित इंगोले | Published: November 06, 2020 9:23 AM

गुंजन लता या वाराणसीला राहणाऱ्या आहे. सध्या त्या अहमदाबादमध्ये राहतात. त्या बॅंकेत नोकरी करतात आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत.

'कौन बनेगा करोडपती'च्या गुरूवारी झालेल्या एपिसोडमध्ये गुंजन लता या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांनी खेळ फारच शानदार पद्धतीने खेळला.  त्यांनी त्यांची पहिली लाइफलाईन २० हजार रूपयांच्या प्रश्नावर घेतली होती. ३ लाख २० हजार रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी दोन लाइफलाईन वापरल्या. गुंजन यांनी ६ लाख ४० हजार रूपयांच्या प्रश्नावर आणखी एका लाइफलाईनचा वापर केला. 

प्रश्न होता - तानसेन व्यतिरिक्त यातील कुणाला स्वामी हरिदास यांचे शिष्य मानलं जातं? पर्याय होते - सनातन गोस्वामी, विद्यापति, चंडीदास, बैजनाथ मिश्र. बरोबर उत्तर होतं - बैजनाथ मिश्र.

कोणत्या प्रश्नावर केलं त्यांनी क्विट

गुंजन यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर शो सोडलला १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यावर त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाईन शिल्लक राहिलेली नव्हती.  (KBC: रेखा राणीकडे दूधासाठीही नव्हते पैसे, 'या' प्रश्नावर शो क्विट करत जिंकले ६ लाख ४० हजार रूपये)

प्रश्न होता  - मुंबई नेव्हल हाऊसमध्ये यातील कोणत्या कपडे कंपनीचं मुख्यालय आहे. पर्याय होते - रेमंड, टाटा टेक्साइल्स, बिन्नी मिल्स, बॉम्बे डाइंग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं  - बॉम्बे डाइंग.. (KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?)

गुंजन लता या वाराणसीला राहणाऱ्या आहे. सध्या त्या अहमदाबादमध्ये राहतात. त्या बॅंकेत नोकरी करतात आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत.

KBC ला मिळणार या सीझनची पहिला करोडपती

कौन बनेगा करोडपतीला या सीझनला पहिली करोडपती मिळाली आहे. शोसंबंधी एक प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, नाजियाने एक कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे. अमिताभ बच्चन हेही पूर्ण जोशात घोषणा करत आहे की, त्यांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत. नाजिया या सीझनच्या पहिल्या कोट्यधीश स्पर्धक ठरल्या आहेत. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन