Join us  

Kasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:30 PM

कोमोलिकाचा लुक इंडो-वेस्टर्न ठेवण्यात आला आहे. मुळात कोमोलिका या व्यक्तिरेखेसाठी हटके स्टाइल असावी असे एकता कपूरचे इच्छा होती.

एकता कपूर लवकरच 'कसौटी जिंदगी की २' रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या मालिकेतून 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अक्षरा बहू  म्हणजेच हिना खान कसौटी जिंदगी की २ झळकणार आहे. या मालिकेत ती कोमोलिका या भूमिकेतून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यांत कोमोलिकाची एंट्री होताना दिसते आहे. मात्र कोमोलिकाचा चेहरा दिसत नसून पाठमोरा लुकमध्ये कोमोलिकाची एंट्री दाखवण्यात आलीय. पाठमोरा लूकमध्ये हिना खानचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय.  

कोमोलिकाचा लुक इंडो-वेस्टर्न ठेवण्यात आला आहे.मुळात कोमोलिका या व्यक्तिरेखेसाठी हटके स्टाइल असावी असे एकता कपूरचे इच्छा होती. जवळपास 7 डिझायनर्सना एकता कपूरने रिजेक्ट केले होते. कोमोलिकाच्या ड्रेसिंगपासून ते मेकअपपर्यंत सगळ्याच गोष्टीत बारकाईने एकता कपूरने लक्ष दिले आहे. आता कोमोलिकाची पहिली झलक समोर आल्यावर रसिकही यांवर संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसतायेत.मुळात एकता कपूरसाठी कसौटी जिंदगी की 2 हा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्यामुळे  डायरेक्शन, एडिटिंग, स्क्रिप्टिंग आणि साउंड क्वालिटीवर एकता स्वतःहुन लक्ष देत आहे. 

पूर्वी 'कसौटी जिंदगी' मालिकेत  उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाही भूमिका साकारली होती. आजही उर्वशीला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत.इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते.या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान तर श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे.

नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोमोलिकाच्या रूपात हिना आणि पूर्वी कोमोलिका साकारलेली उर्वशी यामध्येही आत्तापासूनच तुलना केली जात आहे. फक्त ट्रेलरवरुन दोन अभिनेत्रींमध्ये तुलना करणं योग्य नसल्याचेही सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2एकता कपूरहिना खान