Join us

कार्तिक नायराचा लवकरच अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 15:45 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षरा आणि नैतिकची लव्हस्टोरीमुळे ही मालिका रसिकांच्या घराघरांत आपले स्थान निर्माण करू शकली. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षरा आणि नैतिकची लव्हस्टोरीमुळे ही मालिका रसिकांच्या घराघरांत आपले स्थान निर्माण करू शकली. आता पुन्हा एकदा एक नव्या वळणारवर ही मलिका येऊन पोहोचली आहे. या मालिकेत पुन्हा एक लव्हस्टोरी फुलतांना दिसणार आहे. होय, हे लव्हबर्डस आहेत नायरा आणि कार्तिक. यांच्या लव्हस्टोरीविषयी अक्षरा आणि नैतिक यांना माहिती होताच अक्षराने तिच्या लाडलीचा हात कार्तिकच्या हातात द्यायचा निर्णय घेतला आहे.तर दुसरीकडे गायुही कार्तिकच्या प्रेमात असते. मात्र कार्तिकचे प्रेम हे नायरावर असल्याचे समजताच तीही नायराला कार्तिकच्या प्रेमाविषयी समजवते. आपल्या मुलीचे कार्तिकबरोबर खरे प्रेम असूनही ती या प्रेमाचा स्वीकार करत नाही. हे कळताच अक्षरा आणि नैतिक या दोघांच्या प्रेमाला सहमती देतात. मात्र कार्तिकला कुटुंबाच्या सहमती बरोबरच नायराचा पूर्ण होकार हवाय. त्यासाठी तो तिची समजुत काढण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच नायराही कार्तिकच्या प्रेमाला होकार देणार असूून मालिकेत अक्षरा आणि नैतिक यांच्या ऐवजी आता नव्या प्रेमाचे अंकुर फुलताना पाहायला मिळणार आहे.