Join us  

करिष्मा कपूरने चक्क रेमोजवळ व्यक्त केली इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 12:22 PM

रेमो डिसुझाबरोबर ‘हसीना मान जाएगी’ चित्रपटातील ‘व्हॉट इज युवर मोबाईल नंबर’  या गाण्यावर केलेल्या डान्स परफॉर्मन्सवरही  उपस्थितांनी मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. 

‘डान्स+4’ कार्यक्रमात नुकतेच करिष्मा कपूर अतिथी म्हमून सहभागी झाली होती.  करिअरच्या सुरूवातीला रेमो हा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा. आणि त्याच्या मेहनतीने  आज तो आघाडीचा नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. हाच त्याचा करिअर ग्राफ दाखवणारा एक परफॉर्मन्स त्याने यावेळी सादर केला.यानंतर रेमोने करिष्माला एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की ‘रक्षक’ या चित्रपटातील तिच्या ‘सुंदरा सुंदरा’  या गाण्यात आपण  बॅकग्राऊंड डान्स करणारा एक सामान्स कलाकार होतो. त्याचा हा किस्सा  ऐकून करिष्माला धक्काच बसला. तिला हे गाणे आणि तेव्हाचा प्रसंग आठवत नव्हता. पण इतक्या स्ट्रगल करून आज या उच्च स्थानापर्यंत पोहोचल्याबद्दल तिने रेमोचे अभिनंदन केले आणि ती म्हणाली, “रेमोने एक दिवस माझ्यासाठी नृत्य दिग्दर्शन करावं, अशी माझी इच्छा आहे.” नायिकांच्या पार्श्वभागी नृत्य करणार्‍्या ज्युनिअर कलाकारांचे महत्त्व सांगताना करिष्मा म्हणाली, “हे बॅक-अप  डान्सर नायक-नायिकांसाठी मोठा आधार असतात आणि कोणत्याही गाण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं.” 

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील अप्रतिम नृत्यकौशल्य पाहून थक्क झालेली करिष्मा त्यांच्यात मिसळली आणि व्यासपिठावर उतरली. तेव्हा काही स्पर्धकांनी तिच्या उँची है बिल्डिंग, टन टना टन, सोना कितना सोना है, चक धूम, इश्क है सुहाना, तुम तो धोकेबाझ हो  या सुपरहिट गाण्यांवर नृत्य  सादर करत या शोची रंगत अधिक वाढवली होती.  यानंतर तिने रेमो डिसुझाबरोबर ‘हसीना मान जाएगी’ चित्रपटातील ‘व्हॉट इज युवर मोबाईल नंबर’  या गाण्यावर केलेल्या डान्स परफॉर्मन्सवरही  उपस्थितांनी मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले. 

सध्या करिश्माच्या सिनेमाची चर्चा नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. मात्र सोशल मीडियावरील करिश्माचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे. या फोटोंमध्ये तिचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या करिश्माचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. ब्लॅक आणि ऑरेंज कलर कांबीनेशन   लेंहग्यामध्ये करिश्माचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. तिचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली. करिश्माचा लूक तर भारी मात्र ती लग्न करणार की काय अशा शक्यतेने रसिकांचा विशेषतः चर्चांना उधाण आले  आहे. मात्र या फोटोमागचे रहस्य म्हणजे तिने नुकतेच एक ब्रायडल फॅशन शोमध्ये या अंदाजात रॅम्प वॉक केले. मोठ्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच करिश्मा वेगळ्या आणि हटके अंदाजात रसिकांच्या समोर आली होती. 

टॅग्स :डान्स प्लस 4करिश्मा कपूररेमो डिसुझा