Join us

​करणवीर झाला पिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 13:46 IST

करणवीर बोहराची पत्नी तिजय सिधूने नुकत्याच दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. एकावेळी दोन बाळांचे घरी आगमन झाल्यामुळे करणवीर सध्या ...

करणवीर बोहराची पत्नी तिजय सिधूने नुकत्याच दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. एकावेळी दोन बाळांचे घरी आगमन झाल्यामुळे करणवीर सध्या भलताच खूश आहे. तिजय ही मुळची कॅनडाची आहे. तिचे कुटुंबदेखील तिथेच स्थायिक असल्याने तिने तिच्या बाळांना कॅनडात जन्म देण्याचा निर्णय घेतला. ती अनेक महिन्यांपासून कॅनडातच आहे. तिने आणि करणवीरने केलेले प्रेग्नन्सी शूट सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. तिजयने कॅनडातील एका रुग्णालयात दोन गोड मुलींना जन्म दिला. यावेळी तिचे कुटुंब तिच्यासोबत होते. करणवीर सध्या नागिन 2 या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. पण तरीही तो त्याच्या बाळांसाठी वेळ काढणार आहे. मालिका स्वीकारण्याच्या आधीच बाळ झाल्यानंतर चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक मी घेईल असे त्याने प्रोडक्शन हाऊस आणि निर्माती एकता कपूरला सांगितले होते. त्यामुळे तो काही दिवस तरी त्याच्या पत्नी आणि मुलींसोबत वेळ घालवणार असल्याचे म्हटले जात आहे.करणवीर आणि तिजय छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध कपलपैकी एक कपल आहे. त्यांचे लग्न 2006मध्ये झाले. करणवीरने जस्ट मोहोब्बत, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कसोटी जिंदगीसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे तर तिजयदेखील एक अभिनेत्री असून करणवीर आणि तिजय यांनी शरारत या मालिकेत सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तिने अनेक पंजाबी चित्रपटातही काम केले आहे. तिजय आणि करणवीर हे दोघे जोडीने खतरों के खिलाडी, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येदेखील एकत्र झळकले होते. या दोघांनी मिळून लव्ह यू सोनिये या चित्रपटाची निर्मितीदेखील केली होती.