कपिल शर्माच्या नव्या शोचे शूटिंग रद्द, सेटवरुन शूट न करताच निघून गेला टायगर श्रॉफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 14:18 IST
दोन दिवसांनतर कपिल शर्माचा नवा शो 'फॅमली टाईम विद कपिल शर्मा' शो सुरु होणार आहे. गेल्या वर्षी कपिलच्या आजारपणामुळे ...
कपिल शर्माच्या नव्या शोचे शूटिंग रद्द, सेटवरुन शूट न करताच निघून गेला टायगर श्रॉफ
दोन दिवसांनतर कपिल शर्माचा नवा शो 'फॅमली टाईम विद कपिल शर्मा' शो सुरु होणार आहे. गेल्या वर्षी कपिलच्या आजारपणामुळे कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो बंद करण्यात आला होता. त्यावेळी अशी ही चर्चा होती की कपिलला लागल्या मद्यपानाच्या व्यसनामुळे कपिलचे तब्येत बिघडली होती. कपिलच्या सेटवरुन शाहरुख खान, अजय देवगण यांचे सारखे सुपरस्टार येईन परत गेले होते. त्यावेळी कपिलने म्हणाला होते की, ''मी काय मुर्ख आहे का की ऐवढ्या सुपरस्टार्ससोबतचे शूट रद्द करु किंवा त्यांना वाट बघायला लावू. हे सगळे करुन मला काही आनंद मिळत नव्हता.'' कपिलचा नवा शो 'फॅमिली टाईम विद कपिल शर्मा'च्या पहिल्या भागाचा पाहुणा आहे अजय देवणग. पहिल्या भागाचे शूट पूर्ण झाले आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात रिलीज होणार चित्रपट 'बागी 2'चे कलाकार कपिलच्या सेटवर पोहोचेले होता. मात्र शूटिंग रद्द करण्यात आली. यानंतर चॅनलने लगेच याविषयावर एक स्टेटमेंट जारी केले, ज्यात लिहिले होते, सेटवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आजचे शूट रद्द करण्यात आले. आजच्या शेड्यूलला रिशेड्यूल करण्यात आले आहे. आम्ही कार्यक्रमाची नवी तरीख लवकरच सांगू. कोणत्याही प्रकाराच्या अडचणींसाठी आम्ही माफी मागतो आहे. काही दिवसांपूर्वी कपिल आपल्या शोसाठी प्रेस कॉन्फ्रेस ठेवणार होता, मात्र तीही रद्द करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सुनील ग्रोवरमुळे ती रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सुनील आणि कपिलचा सोशल मीडियावर वाद झाला होता. यावादामुळे कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्याचे झाले असे की सुनीलला एकाने ट्वीटरवर विचारले की ,तुला कपिलच्या नव्या शोसाठी विचारणा झालीयं का? असा प्रश्न एका चाहत्याने सुनीलला सोशल मीडियावर विचारला. यावर सुनीलने अगदी सविस्तर उत्तर दिले. ‘भाई, आप जैसे कुछ और लोग भी मुझसे सेम पुछते है. लेकीन मुझे इस शो के लिए कॉल नहीं आया. मेरा फोन नंबर भी सेम है. इंतजार कर के अब मैने कुछ और साईन कर लिया कल. आप लोगों की दुआ से एक अच्छे प्रोजेक्ट के साथ जुडा हूं. जल्दी आपके सामने आता हू...’, असे सुनीलने लिहिले.पण सुनीलचे हे tweet का कुणास ठाऊक पण कपिलला झोंबले आणि त्याने सुनीलला चांगलेच सुनावले. ‘मी तुला शंभरदा फोन केला. दोनदा तुझ्या घरी येऊन गेलो. प्लीज, नाही त्या अफवा पसरवू नकोस,’ असे त्याने सुनीलला उद्देशून लिहिले. ‘ यापुढे मी कुणालाही माझा फायदा घेऊ देणार नाही. इनफ इज इनफ़...’,असेही कपिल म्हणाला.