Join us

कपिल शर्मा का घेतोय आपल्या शरीरावर मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 14:50 IST

‘द कपिल शर्मा शो’मुळे घरोघरी पोहचलेला कपिल शर्माने चित्रपटातही आपले नशीब अजमावले आहे. मात्र त्याने आपले लक्ष अजुनही कॉमेडी ...

‘द कपिल शर्मा शो’मुळे घरोघरी पोहचलेला कपिल शर्माने चित्रपटातही आपले नशीब अजमावले आहे. मात्र त्याने आपले लक्ष अजुनही कॉमेडी शोवरच ठेवले आहे. लोकांना हसविण्यात त्याला फार मजा येते असे तो नेहमीच सांगतो पण सध्या कपिल आणखी एका कामात व्यस्त आहे. तो आपल्या शरिरावर चांगलीच मेहनत घेत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटो मधून तरी असेच दिसते. या फोटोमध्ये तो व्यायाम करताना दिसतो आहे. म्हणजे तो आपला बराच वेळ व्यामाला देत असल्याचे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा आपल्या शरिरावर चांगलीच मेहनत घेत आहे. यासाठी तो सकाळी उठतो. व्यायामाला सुरुवात करतो. कपिलचा सहकलाकार सुनील ग्रोव्हर याने सोशल मीडियावर हे फोटो अपलोड केले आहेत. यातील एका फोटोमध्ये कपिल शर्मा डबेल्स उचलताना दिसत असून त्याचे मसल्स चांगलेच वर आलेली दिसत आहेत. सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा शो मध्ये डॉक्टर मशहूर गुलाटी या पात्रात दिसत असून तो लवक रच एका चित्रपटात डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्हू घेताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपटासाठी ही तयारी करीत असून कडाक्याच्या थंडीतही सकाळी उठून तो व्यायाम करीत आहे. या चे सर्व फोटो त्याने आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केले आहेत. कपिल शर्मा लवकरच एका पिरियेड कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाचे नाव ‘फि रंग’ असू शकते असेही सांगण्यात येत आहे. यासोबतच तो टीव्हीवरील कॉमेडी शो सुरू ठेवणार आहे. }}}} ">http://