Join us  

नवीन वर्षात चाहत्यांना कपिल शर्मा सरप्राईज देणार, सोशल मीडियावर शेअर केली GOOD NEWS

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 2:17 PM

कपिल शर्मा मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कपिल शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज दिल आहे. आपण आपल्या चिंता मागे सारत आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आणखी आनंदी बनवण्यासाठी तयार राहा. कारण आता कपिल शर्मा पुन्हा एकदा खास रसिकांना मनोरंजनाची ट्रीट देणार आहे. लवकरच लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर डेब्यू करणार आहे.

नुकतेच सोशल मीडियावर त्याने एक ट्विट केले, त्या ट्विटमध्ये त्याने त्याचा आनंद व्यक्त केला होता. अनेकांना कपिल पुन्हा एकदा बाबा बनणार असल्याचे वाटले. त्याचे ट्विटमध्ये त्याने नक्की कोणत्या गोष्टीसाठी आनंद व्यक्त केला आहे याविषयी काही म्हटले नव्हते. त्यामुळे चाहतेही संभ्रमात होते गिन्नी दुस-यांदा आई बनणार असल्याच्याही चर्चांना उधाण आले होते.

 

मात्र कपिल शर्माच्या आनंदाला कारण त्याचे डिजीटल विश्वात पदार्पण हेच आहे.त्यामुळे कपिल शर्माचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. ख-या अर्थाने कपिल शर्माची नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली आहे.

कपिल शर्माचे होस्ट करणारा आणि आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी लोकांचे मनोरंजन करणारा कपिल शर्मा शोच्या पहिल्या सीजनमध्ये वीकेंड एपिसोडसाठी 60 ते 70 लाख लाखांचे मानधन घ्यायचा. पण आता तो प्रत्येक वीकेंडच्या एपिसोडसाठी एक कोटी रुपये घेतो. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने मानधनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला पण संघर्ष सुरुच होता.

 

2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यानंतर कपिलने अनेक शो केले़ अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले. 

टॅग्स :कपिल शर्मा