Join us  

कॉमेडी किंग कपिल सातासमुद्रापार, या हॉलीवुडपटात कपिलची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 5:08 PM

'एंग्री बर्ड 2' या अॅनिमेटेड सिनेमासाठी कपिल शर्मा आपला आवाज देणार आहे.

कॉमेडीयन कपिल शर्मा छोटा पडदा आणि बॉलिवूडमध्ये  'किस किसको प्यार करूं' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो 'फिरंगी' या चित्रपटातही पहायला मिळाला. बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवल्यानंतर आता तो थेट हॉलिवूड प्रोजेक्टसाठी काम करणार आहे. होय, कपिल शर्माच्या हाती एक मोठा हॉलिवूड प्रोजेक्ट लागला आहे.'एंग्री बर्ड 2' या अॅनिमेटेड सिनेमासाठी कपिल शर्मा आपला आवाज देणार आहे.

 

चित्रपटाचा  हिंदी व्हर्जनसाठी  रेड या पात्राला कपिल शर्मा आवाज देणार आहे. कपिल शर्माच्या आवाजामुळे हिंदी व्हर्जनमधील हे पात्र दमदार वाटेल यांत शंका नाही. नुकताच या सिनेमाचा इंग्रजी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हिंदी व्हर्जन ट्रेलर पाहण्यासाठी रसिकांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. ब-याच वेळा कपिल शर्मा वेगवेगळ्या कलाकारांची मिमिक्री करताना पाहायला मिळाले आहे. आता हीच जादून थेट सातासमुद्रापार ऐकायला मिळणार म्हटल्यावर कपिलसाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

'एंग्री बर्ड'चा पहिला भाग हा 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता.त्याच सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे. या सिनेमाचे थ्योरप वैन ओरमनने दिग्दर्शन केले आहे. 23 ऑगस्टला एंग्री बर्ड 2 सिनेमा प्रदर्शित होणार असून हिंदी ऐवजी तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

 

यंदाचे वर्ष कपिलसाठी खूप खास असणार आहे. कारण त्याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.  त्याची पत्नी गिन्नी बऱ्याचदा 'कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजी देखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते. तिच्या कुटुंबियांना वाटते की, कपिलने जालंदरमध्ये गिन्नीसोबत राहावे. इतकेच नाही तर त्याच्या आईला देखील गिन्नीसोबत प्रेग्नेंसीच्या काळात रहायचे आहे. सध्या गिन्नीही मुंबईत कपिलसह राहात नसून ती जालंदरमध्ये राहात आहे. गिन्नी चतरथ ही कपिलची बालपणाची मैत्रीण आहे. डिसेंबर, २०१८मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. 

टॅग्स :कपिल शर्मा