Join us  

द कपिल शर्मा शोमधील सुमोनाला मालदिवमध्ये भेटला हा खास व्यक्ती, करतेय त्याच्यासोबत धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 3:53 PM

सुमोना सोबत दिसत असलेला हा व्यक्ती कोण आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 

ठळक मुद्देसुमोनाने एका व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा माझा जवळचा मित्र मला अचानक मालदिवला भेटला असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमामुळे सुमोना चक्रवतीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तिने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सुमोनाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या एका मित्राने तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सुमोना मला अचानक मालदिवला भेटली असे या फोटोसोबत लिहिले आहे. सुमोना सोबत दिसत असलेला हा व्यक्ती कोण आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 

सुमोनासोबत दिसत असलेल्या या व्यक्तीचं नाव मोहित मुधा असून तो सुमोनाचा अनेक वर्षांपासूनचा खूप चांगला मित्र आहे. शिवाय तो एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. सुमोनाचा एक बिकिनीमधील फोटो देखील त्याने मालदिवला काढला असून सुमोनाने तो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती ही 'द कपिल शर्मा शो' मधील सर्वात जुन्या कलाकारांपैकी एक आहे. 'कॉमेडी सर्कस' मध्ये ती कपिल शर्मासोबतही होती. 'द कपिल शर्मा शो' मध्ये ती भुरीची भूमिका साकारत आहे आणि तिच्या अभिनयाची, नृत्याची, विनोदाच्या टाइमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :सुमोना चक्रवर्तीद कपिल शर्मा शो