Join us  

हेलन, आशा पारेख आणि वहिदा रहमान यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले हे किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 4:42 PM

यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत.

ठळक मुद्देहेलन यांच्याविषयी अर्चना पुरणसिंग सांगते, मी केवळ हेलन यांच्यामुळे या इंडस्ट्रीत आले होते मी लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहिले असून त्यांचा डान्स मला प्रचंड आवडत असे. त्यांचे नृत्य पाहिल्यावर मला देखील अभिनेत्री बनयाचे आहे हे मी घरी सांगितले होते. 

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींना पाहण्याचा योग येणार आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा निर्माता हा सलमान खान आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात त्याने त्याच्या भावंडांसोबत आणि वडिलांसोबत हजेरी लावली होती. प्रेक्षकांना हा भाग प्रचंड आवडला होता. यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत.

हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. या कार्यक्रमातील अर्चना पुरणसिंग ही वहिदा रहमान आणि हेलन यांची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे तिच्यासाठी या भागाचे चित्रीकरण करणे हे खूपच खास होते. वहिदा रहमान यांना पाहून तर अर्चना खूपच भावूक झाली होती. त्यांच्या एका भेटीविषयी तिने या कार्यक्रमात सांगितले की, मेधा जलोटा यांच्या वाढदिवसाला मी वहिदा यांना भेटले होते. त्यांना पाहाताच त्यांच्याशी मी बोलायला गेले. त्यांना हाय केल्यानंतर पुढे काय बोलायचे मला काहीच सुचत नव्हते. त्यामुळे तिथून मी लगेचच निघून गेले. त्यानंतर काहीच मिनिटांत मी जेवत असताना त्या माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला न ओळखल्यामुळे माझी माफी मागितली. वहिदा रहमान यांच्यासारख्या महान अभिनेत्री मला ओळखतात हे मला कळले तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय  होता.

 

हेलन यांच्याविषयी अर्चना पुरणसिंग सांगते, मी केवळ हेलन यांच्यामुळे या इंडस्ट्रीत आले होते मी लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहिले असून त्यांचा डान्स मला प्रचंड आवडत असे. त्यांचे नृत्य पाहिल्यावर मला देखील अभिनेत्री बनयाचे आहे हे मी घरी सांगितले होते. 

कपिल या कार्यक्रमात या तिन्ही अभिनेत्रींसोबत त्यांच्या करियरविषयी गप्पा मारणार आहे. आशा पारेख यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण कसे झाले, वहिदा रहमान यांचा आवडता सहकलाकार कोण आहे, तसेच तुमच्या प्रसिद्ध गाण्यामुळे त्यावेळेच्या अभिनेत्रींना तुमचा तिरस्कार वाटायचा नाही का असे प्रश्न कपिल त्यांना विचारणार आहे.  

टॅग्स :द कपिल शर्मा शोहेलनआशा पारेखवहिदा रहमानकपिल शर्मा