Join us  

दाम करी काम, कपिल शर्माने वाढवलं मानधन; एका एपिसोडसाठी मिळणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 7:38 PM

21 जुलै पासून तो रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा आहेत. कपिल त्याच्या कॉमेडीने रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर बाकी सोडत नाही.

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय कपिल शर्माने. कॉमेडियन कपिल शर्माचा ‘कपिल शर्मा शो’  पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो.टीव्हीच्या माध्यमातून तो लोकांच्या घरांत पोहोचला आहे. कपिल शर्माची संपत्ती दरवर्षी वाढत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून कपिल काही कारणामुळे छोट्या पडद्यापासून दूर होता.दणक्यात छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सुपरडुपर हिट आणि रसिकांचा लाडका शो कपिल शर्मा शोचा तिसरा सिझनच्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आता कपिल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. लॉकडाऊननंतर कपिल शर्माने त्याचे मानधनही वाढवले आहे.  दाम करी काम हे आपण वारंवार ऐकलंय... म्हणूनच की काय कामासाठी मिळणारे मानधन वाढवण्याचा निर्णय कपिलने घेतलाय.

 

कपिल पूर्वी एका एपिसोडसाठी 30 लाख रूपये घेत होता. त्यानंतर कपिलने त्यांची फी 50 लाख रूपये केली. आता कपिल एका एपिसोडसाठी 1 कोटी रूपये घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. 21 जुलै पासून तो रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा आहेत. कपिल त्याच्या कॉमेडीने रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर बाकी सोडत नाही.

 

त्यामुळेच काय तगडी रक्कम घेतल्यानंतर रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या एनर्जीसह रसिकांच्या भेटीला कपिल शर्मा येणार आहे. १ कोटी रुपये मानधन खिशात आल्यानंतर एनर्जी, जोश आणि उत्साहामुळेच कपिलने इतर विनोदी कलाकरांनाही कमाईच्या बाबतीच मागे टाकले आहे. मानधनाच्या बाबतीत हम भी किसीसे कम नही हेच दाखवून दिलंय.

टॅग्स :कपिल शर्मा