Join us  

कपिल शर्मा-गिन्नी चतरथ यांच्यासोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील हे पाच जोडपे देणारेत यंदा Good News!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:34 PM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हे पाच प्रसिद्ध कपल लवकरच गुड न्यूज देणार आहेत.

छोट्या पडद्यावरील कॉमेडीयन कपिल शर्मापासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकार बरून सोबती, माही विज, सारा अफरीन खान न नेहा कौल सध्या खूप आनंदी आहेत. कारण ते पहिल्यांदाच पालक बनणार आहेत.

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहेत. कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते.

जय भानुशाली आणि माही विज यांनी २०१०मध्ये लग्न केले आणि ते लवकरच एका बाळाला जन्म देणार आहेत. २०१७ मध्ये त्या दोघांनी केअरटेकरच्या  दोन मुलांना दत्तक घेतले होते. आता नुकतीच त्यांनी ते एका बाळाचे पालक बनणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आणि एका छान फोटोसोबत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता बरून सोबती आणि त्याची पत्नी पाशमीन लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळींना निमंत्रित करून बेबी शॉवरचे आयोयन केले होते. 

जमाई राजा मालिकेत अभिनेत्री सारा अरफीन खान लवकरच आई बनणार आहे. सारा अरफीनसोबत २००९मध्ये लग्नबेडीत अडकलीय. साराने ८ जुलै तिची डिलेवरी डेट असल्याचे सांगितले.

बहू हमारी रजनीकांत फेम नेहा कौल नुकतीच बिट्टी बिझनेसवाली मालिकेत अलंक्रिताच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. आता लवकरच ती गुड न्यूज देणार आहे. तिने लेज्ली सिंगसोबत विवाहबंधनात अडकली. नुकतेच तिने सोशल मीडियावर ती आई बनणार असून तिला सातवा महिना लागल्याचे सांगितले.  

टॅग्स :कपिल शर्मा