शो बंद झाल्याने अखेर कपिल शर्मा मान्य केली आपली चूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 10:22 IST
सध्या कपिल शर्माचे फॅन्स नाराज आहे. त्यामागचे कारण तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय ते.सततच्या घसरणाऱ्या टीआरपीमुळे कपिलचा शो ...
शो बंद झाल्याने अखेर कपिल शर्मा मान्य केली आपली चूक !
सध्या कपिल शर्माचे फॅन्स नाराज आहे. त्यामागचे कारण तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय ते.सततच्या घसरणाऱ्या टीआरपीमुळे कपिलचा शो बंद करण्यात आला आहे. कपिलचे फॅन्स त्याच्या शोची वाट आठवडाभर बघायचे. कपिलने हा शो आपल्या विनोदांच्या शैलीच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. प्रेक्षकांचे ही अल्पवधीत या शोला भरभरुन प्रेम लाभले होते. कपिलसाठी शो बंद होणे हे कोणत्या झटक्याहुन कमी नव्हते. जे काही झाले ते बरोबर की चूक हे ऐवढ्यात सांगता येणे कठिण आहे. नक्की शो बंद का करण्यात आला यामागचे कारण ही आज नाही तर उद्यासमोर येईलच. ALSO RAED : तर 'या' व्यक्तिमुळे बंद झाला कपिल शर्माचा शो!सूत्रांच्या माहितीनुसार कपिल शर्माचे म्हणणे आहे की हा शो बंद होण्यामागे तो स्वत:कारणीभूत आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान कपिलने मान्य केले फ्लाईटमध्ये सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भांडणाला तो स्वत: जबाबदार होता. पुढे तो म्हणाला शो ची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीती सिमोसबरोबर असलेले माझे नाते एका चुकीच्या वळणावर संपले. कपिलच्या बिघडणाऱ्या तब्येतीमुळे गेल्या 3 महिन्यात 6 वेळा शूटिंग रद्द करण्यात आले. ज्यामुळे इंडस्ट्रितील अनेक स्टार्सची नाराजी कपिलने ओढवून घेतला. गत शुक्रवारी रिलीज झालेल्या बादशाहोच्या प्रमोशनसाठी अजय देवगण कपिलच्या सेटवर आला होता. मात्र त्याला शूटिंग केल्याशिवायच परतावे लागले होते. यामुळे अजय कपिलवर चांगलाच नाराज झाला होता. ''आपण पुन्हा कपिलच्या सेटवर येऊ कि नाही माहिती नाही असे अजय देवगण म्हणाला होता.'' कपिलचे म्हणणे आहे की त्यांनेच सोनी टीव्हीकडून ब्रेक मागितला. गेल्या 10 वर्षांपासून कपिल छोट्या पडद्यावर सतत काम करतोय यामुळे आपली तब्येत खराब झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच काही दिवसांच्या ब्रेकसाठी शो बंद करण्यात आल्या असल्याचे कपिल सांगतो.