Join us  

इंडियन आयडॉलच्या सेटवर कपिल शर्माला मिळाले हे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 6:30 AM

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावणार आहे. 

ठळक मुद्देकपिल शर्माचे लग्न १२ डिसेंबरला होणार असून या लग्नाची सध्या जंगी तयारी सुरू आहे. आता इंडियन आयडॉलचे स्पर्धक या कार्यक्रमाच्या सेटवर कपिलची बॅचलर पार्टी साजरी करणार आहेत. लोकांना खळखळून हसवण्याची ताकद असलेल्या कपिलचे इंडियन आयडॉलच्या टीमकडून जोरदार स्वागत झाले आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सेटवर त्याला एक खूप छान सरप्राईज देखील मिळाले. या कार्यक्रमाच्या टीमने कपिलसाठी खास पार्टी आयोजित केली होती. मनीष पॉलने तर बॅचलर पार्टीची धमाल वाढवण्यासाठी काही ढोलवाल्यांना मंचावर बोलावले होते.

इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक राहिले असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावणार आहे. 

कपिल शर्माचे लग्न १२ डिसेंबरला होणार असून या लग्नाची सध्या जंगी तयारी सुरू आहे. आता इंडियन आयडॉलचे स्पर्धक या कार्यक्रमाच्या सेटवर कपिलची बॅचलर पार्टी साजरी करणार आहेत. कपिल शर्माचे लग्न आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील त्याचे पुनरागमन यासाठी इंडियन आयडॉल 10 च्या सेटवर त्याने नुकतीच हजेरी लावली होती. लोकांना खळखळून हसवण्याची ताकद असलेल्या कपिलचे इंडियन आयडॉलच्या टीमकडून जोरदार स्वागत झाले आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सेटवर त्याला एक खूप छान सरप्राईज देखील मिळाले. या कार्यक्रमाच्या टीमने कपिलसाठी खास पार्टी आयोजित केली होती. मनीष पॉलने तर बॅचलर पार्टीची धमाल वाढवण्यासाठी काही ढोलवाल्यांना मंचावर बोलावले होते. सगळ्याच स्पर्धकांनी मस्त ताल धरला होता. एवढेच नव्हे तर या स्पर्धकांनी कपिलला ढोलताशांच्या संगीतावर नृत्य देखील करायला भाग पाडले. कपिल आणि सगळीच मंडळी प्रचंड जोशात नृत्य करत असल्याने ढोलवाल्यांना देखील ढोल वाजवायला खूपच मजा येत होती. ते ढोल इतक्या जोराजोरात वाजवत होते की, त्यात एक ढोलच तुटला. या सेलिब्रेशनबद्दल बोलताना कपिल शर्मा उत्साहात सांगतो, “माझ्यावर केलेल्या या प्रेमाच्या वर्षावाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांना म्हणजे, स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षकांना माझ्या विवाहाचे आमंत्रण मी देत आहे.” इंडियन आयडॉल 10 मधील हा कपिल शर्माचा स्पेशल भाग प्रेक्षकांना वीकएंडला रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉलकपिल शर्मा