Join us  

कुठं कुठं जायचं हनिमूनला! अमृता बने-शुभंकर एकबोटे कुठे जाणार फिरायला? फोटो शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:51 AM

अभिनेत्री अमृताने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता बने आणि शुभंकर एकबोटे नुकतेच विवाहबंधनात अडकले. 21 एप्रिल 2024 ला अमृताने शुभंकर एकबोटेसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.  मोठ्या दिमाखात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. अभिनेत्रीचा साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळदीसोबतच लग्नाच्याही चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. आता हे नवविवाहित जोडपं हनिमुनला निघालं.

अभिनेत्री अमृताने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं पासपोर्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नववधू अमृताचा नुर चढलेलाच दिसतोय. तिचं सौंदर्य आणखी खुलून आलंय. तर शुंभकरने अमृतासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात हे दोघे वेस्टर्न लूकमध्ये बॅगसोबत दिसून येत आहेत. यासोबतच शुभंकरने हनिमुन डेस्टिनेशनचा खुलासा केला आहे. हे जोडपं भारतात नव्हे तर परदेशात फिरायला जाणार आहेत. अमृता आणि  व्हिएतनाम फिरायला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'कन्यादान' या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली होती. तर मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलं होती. त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा असून अश्विनी यांनीही अनेक मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख बनवली होती. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवलीय. लवकरच तो 'छावा' या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात काम करणार आहे. तर अमृता बनेनं सातव्या मुलीची सातवी मुलगी, कन्यादान, रंग माझा वेगळा आणि वैजू नंबर 1 या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठी अभिनेता