कंधारीचा ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’मध्ये दिसणार नवा अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 12:05 IST
‘दिया और बाती हम’ मालिकेत अर्पिता खन्नाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रिशिना कंधारी ही आता ‘तू सूरज, मैं साँझ ...
कंधारीचा ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’मध्ये दिसणार नवा अवतार!
‘दिया और बाती हम’ मालिकेत अर्पिता खन्नाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रिशिना कंधारी ही आता ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेत पुन्हा भूमिका एंट्री करणार आहे.याआधी रिशिनाने या मालिकेत पोलिस आयुक्तांची भूमिका साकारलेली होती. अभिनेत्री या मालिकेत आता एका खंबीर राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसेल.तिच्या प्रवेशामुळे मालिकेच्या आगामी भागांना नवे वळण मिळणार आहे.आपल्या प्रवेशाबद्दल रिशिना म्हणाली,“या मालिकेत मी एका नव्या अवतारात दिसेन.पण मला माझा गणवेश आवडायचा,त्यात मला मी पुरुष असल्याची भावना येत असे.त्यात मी माझी देहबोली स्वत:च ठरवली होती आणि सारे स्टंट मीच साकारले होते.तेव्हा मी बंदूक चालवायलाही शिकले होते.”ती म्हणाली, “अर्पिता खन्नाच्या व्यक्तिरेखेने मला एक वेगळंच समाधान दिलं होतं.आता जेव्हा ती एक राजकीय पुढारी बनेल,तेव्हाही ती आपली जादू पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी मी सज्ज आहे.याबद्दल मला खात्री आहे.म्हणून आता मी त्याच भावनेनं पण वेगळ्या वेशात या मालिकेत सहभागी होत आहे.”वास्तव जीवनातील बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी प्रसिध्द असलेली मधुरा नाईक ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत पलोमीची भूमिका साकारीत आहे.माधुरी गेल्या 11 वर्षं इंडस्ट्रीत असून नेहमीच तिची वेशभूषा मॉडर्न राहिली आहे. त्यामुळे या मालिकेच्या वेशभूषेसाठी ती खूप उत्सुक आहे.'दिया और बाती हम' या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा दुसरा भाग 'तू सुरज मैं साझ पियाजी' प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय.डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी ती वर्कआऊट,डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहे. यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते.आता प्रेग्नंसीमुळे वजन वाढलं होते.त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत आहेत. त्यामुळेच ती तिचे वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.