Join us

​जुही दुहेरी भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 14:44 IST

कुमकुम या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार प्रेक्षकांना शनी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ती कित्येक ...

कुमकुम या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार प्रेक्षकांना शनी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ती कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. या मालिकेत ती शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. जुही या मालिकेत संग्या आणि छाया अशा दोन भूमिका साकारणार आहे. शनीदेवाची पत्नी संग्या त्यांच्यावर खूप प्रेम करत असते. पण त्यांच्या अतिशय उष्ण तापमानामुळे त्यांच्यासोबत राहाणे तिला शक्य नसते. त्यामुळे ती तिची एक सावली बनवते आणि या सावलीला छाया असे नाव देते. ती दूर असताना छाया तिच्या कुटुंबियांची काळजी घेईल असे ठरते. जुहीसोबत या मालिकेत सलील अंकोला झळकणार आहे. तो या मालिकेत शनिदेवाची भूमिका साकारणार आहे. सलील एक क्रिकेटर असण्यासोबतच त्याने अभिनयातही आपली चुणूक दाखवली आहे. कोरा कागज या मालिकेत त्याने साकारलेली भूमिका खूप गाजली होती.  जुहीने 2009मध्ये अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केले. लग्न झाल्यानंतर जुहीने मालिकेत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले होते. ती लग्नानंतर ये चंदा कानुन है याच मालिकेत दिसली. त्यानंतर गेल्या सहा-सात वर्षांपासून ती कोणत्याच मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली नाही. ती दरम्यानच्या काळात संतोषी माँ, तेरे लिये या मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत केवळ एका भागासाठी दिसली होती. लग्नानंतर तिने पती पत्नी और वो या एक रिअॅलिटी शोमध्ये सचिनसोबत भाग घेतला होता. तसेच 2012ला ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेली होती. या कार्यक्रमाचे विजेतेपददेखील तिने मिळवले होते.