Join us  

Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:15 PM

Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off Air : ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

लोकप्रिय मालिका  ‘जीव झाला येडापिसा’  या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांची पसंती मिळवण्यात पात्र ठरली होती. दिवसेंदिवस मालिकेतील कथा अधिकाधिक रंजक वळणांमुळे रसिकही चांगलेच खिळून होते. ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी तसेच त्यांची जोडीही प्रेक्षकांना खूप भावली. अभिनेता अशोक फळदेसाई या मालिकेत शिवाची भूमिका साकारतो, तर अभिनेत्री विदुला चौगुले सिद्धीच्या भूमिकेत दिसली. या  कलाकारांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आणि त्यांचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे.

मालिकेतील मुख्य कालाकारांप्रमाणे इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तीरेखेचं विशेष महत्त्व आहे. पहिल्या भागापासून सुरु झालेला मालिकेचा रंजक प्रवास बघता बघता ‘535 भागांचा टप्पा पूर्ण केला.

 

मालिकेच्या रसिकांसाठी एक हिरमोड करणारी बातमी आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘जीव झाला येडा पिसा’  ही मालिका आता छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेतेय. मालिका एका इंटरेस्टिंग वळणावर आली असून तिथंच ही मालिका संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 535 भागांचा टप्पा पूर्ण करून मालिका रसिकांचा निरोप घेत असल्याचे खुद्द चिन्मय मांडलेकरने सांगितले आहे. 

सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत त्याने मालिका बंद होत असल्याची माहिती दिली आहे.  पुराशी, कोविडशी लढली. कले कलेनं वाढली. ५ भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास ‍थांबेल  मालिकेतला संपूर्ण प्रवासाविषयी सांगताना तोही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार मानले आहेत.

ही पोस्ट वाचल्यानंतर रसिकांचाही हिरमोड झाला आहे. आवडती मालिका बंद होणार वाचून कुठेतरी त्यांच्याही मनात वेगळाच काहुर माजला असणार हे मात्र नक्की. अनेकांनी कमेंट करत मालिका किती चांगली होती ? मनोरंजनादृष्टीने मालिकेची कथा आणि कलाकारांचे अभिनयामुळे रसिकांची जिंकलेली मनं आलेल्या कमेंटवरुन स्पष्ट होते. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिकेला आता पूर्णविराम लागणार असल्याचे समजताच चाहत्यांमध्येही निराशा निर्माण झाली असणार हे मात्र नक्की.

टॅग्स :जीव झाला येडापिसाचिन्मय मांडलेकर