जनाई भोसले गाणार हिल पोरी हिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 07:00 IST
आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाºया आशा भोसले यांची नात जनाई भोसले देखील आपला आवाज रसिकापर्यत पोहोचविण्यासाठी सज्ज झाली ...
जनाई भोसले गाणार हिल पोरी हिला
आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाºया आशा भोसले यांची नात जनाई भोसले देखील आपला आवाज रसिकापर्यत पोहोचविण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उषा मंगेशकर यांचे हिल पोरी हिला हे जुने गाणे आता, न्यू व्हर्जनमध्ये येणार आहे. हिल पोरी हिला हे जूने गाणे उषा मंगेशकर यांचे आहे. हे गाणे त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले होते. आता, हेच गाणे न्यू व्हर्जनमध्ये त्यांची नात जनाई भोसले गाणार आहे. तसेच हिल पोरी हिला हे गाणे जुन्या गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार असल्याचेदेखील यावेळी जनाईने सांगितले. तसेच नुकतेच आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने तृतीयपंताच्या बॅडसोबत सिक्स पॅक या गाण्याचे चित्रीकरण केले आहे.