Join us

इट्स पार्टी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:25 IST

मेरे अंगने में या मालिकेच्या टीमने नुकतीच सेटवर एक छोटीशी पार्टी केली. या मालिकेतील एकता कौल, चारू असोपा, प्रीती ...

मेरे अंगने में या मालिकेच्या टीमने नुकतीच सेटवर एक छोटीशी पार्टी केली. या मालिकेतील एकता कौल, चारू असोपा, प्रीती आणि गरिमा परिहार या सगळ्यांनाच मॅगी खूप आवडते. त्यांनी मॅगी पार्टी केली. याविषयी चारू सांगते, "आम्हाला सगळ्यांना मॅगी आवडते. नुकतेच आमचे चित्रीकरण संपूर्ण दिवसभर चालणार होते. त्यामुळे आम्ही आमच्या कॅन्टिनमधून मॅगी मागवली. अनेक कलाकार खाण्याआधी शंभर वेळा कॅलरीज, फॅटचा विचार करतात. पण आमच्यातील कोणीच असे नाहीये. आम्ही सगळेचजण जंक फूडवर तुटून पडतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मॅगीवर मस्त ताव मारला. त्यात त्यादिवशी खूप चांगले वातावरण होते. त्यामुळे मॅगी खायला जास्तच मजा आली."