Join us  

असं झालं होतं 'महाभारत'साठी 'दुर्योधन'चं कास्टिंग, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:20 PM

अभिनेते पुनीत ईस्सर यांनी महाभारतमधील 'दुर्योधन'ची भूमिका केली होती.

दिग्गज अभिनेते पुनीत ईस्सर यांनी महाभारतमधील 'दुर्योधन'ची भूमिका केली होती. तसे तर त्यानंतर कित्येक वेळा महाभारत मालिका बनली मात्र तशी मालिका बनू शकली नाही आणि तसेत कोणत्या कलाकाराने त्यांच्यासारखी दुर्योधनाची भूमिका केली. लॉकडाउनच्या परिस्थितीत पुन्हा एकदा महाभारत दूरदर्शनवर प्रसारीत केले जात आहे. एका मुलाखतीत पुनीस ईस्सर यांनी त्यांची या मालिकेत कास्टिंग कशी झाली होती आणि सुरूवातीला या मालिकेच्या टीमला त्यांच्या आवाजावर विश्वास नव्हता याबद्दल सांगितलं. 

या मुलाखतीत पुनीत यांनी सांगितले की, 1986 सालची गोष्ट आहे जेव्हा हिंदी चित्रपटात स्ट्रगल करत होतो आणि त्यावेळी मला समजले की बी.आर. चोप्रा महाभारत बनवत आहेत. गुफी सर या मालिकेसाठी कास्टिंग करत होते. मी बी.आर. सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितले की सर मी तुमच्या महाभारताचा भाग बनू इच्छितो. त्यांनी मला पाहिले. 6 फूट 3 इंच लांब आणि चांगली शरिरयष्टीवाला माणूस. ते म्हणाले ठीक आहे याला भीम बनवा. मी म्हणालो की, सर मी महाभारत वाचले आहे पण, मला दुर्योधन या पात्रासाठी ऑडिशन द्यायचे आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, चोप्रा साहेबांनी मला म्हटलं की, आम्ही तुम्हाला हिरो बनवू इच्छितो आहे आणि तुम्हाला दुर्योधन का करायचे आहे. मी म्हटलं सर मी संपूर्ण महाभारत वाचला आहे आणि मला वाटते की दुर्योधन हे खूप महत्त्वाचे पात्र आहे. तर मी दुर्योधनसाठी ऑडिशन देऊ शकतो का. बी आर चोप्रा साहेबांना वाटलं की दुर्योधनच्या पात्रासाठी मी डायलॉग बोलू शकणार नाही. पण त्यावर मी त्यांना सांगितलं की मी एक ट्रेंड अभिनेता आहे आणि मी तलफ्फुज शिकलो होतो.

पुनीत ईस्सर म्हणाले की, मी त्यांना जयद्रथचे वथाचा संपूर्ण किस्सा उच्चारीत करून दाखवला. अशाप्रकारे पुनीत ईस्सर यांना दुर्योधनची भूमिका मिळाली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या