Join us  

​माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दातेने केले हे समाजोपयोगी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 7:33 AM

टीआरपीचे उच्चांक गाठलेल्या झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. राधिका ...

टीआरपीचे उच्चांक गाठलेल्या झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. राधिका या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली. पण नकारात्मक भूमिका असलेले गॅरी आणि शनाया देखील रसिक प्रेक्षकांना तितकेच भावले. अनिता दाते म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी राधिका ही मालिकेत एक आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श बहीण आणि आदर्श आई दाखवली आहे. राधिका नेहमीच सगळ्यांची मदत करण्यासाठी तत्पर असते. दुसऱ्या व्यक्तीचे भले होण्यासाठी राधिका तिच्यापरीने जितकी मदत करता येईल तितकी करते. खऱ्या आयुष्यात अनिता देखील तितकीच तत्पर आहे.महाराष्ट्र दुष्काळाशी दोन हात करत असताना अनिताने देखील तिचे योगदान दिले. अनिता सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी तिला दिवसातील अनेक तास द्यावे लागतात. महिन्यातील अनेक दिवस तर याच मालिकेच्या चित्रीकरणात ती बिझी असते. पण तरीही आपल्या शूटिंगमधून वेळ काढून अनिताने नाशिक मधील चानवड आणि सिन्नर तालुक्यातील गावात श्रमदान केले. गावकऱ्यांना श्रमदानासाठी पाठिंबा देत अनिताने त्यांच्या सोबत श्रमदान केले. तिच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रीन व्यक्तिरेखेतील हे साम्य आहे असे म्हणणे खोटे ठरणार नाही.  अनिता दातेचा श्रमदानाचा अनुभव सांगताना ती सांगते, "दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी माझ्यासोबत मुंबईतून अनेक लोक पुढे सरसावले. दुष्काळग्रस्त गावं पाणीदार करण्यासाठी चाललेल्या या लोकचळवळीत अनेकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला, त्याचा मला खुप आनंद आहे. ही लोक चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी. कारण सगळ्यांनी एकत्र येऊन केलेल्या कामला नेहमीच यश मिळते. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे माझे पात्र राधिका सुभेदार हे सगळ्यांच्या घराघरात पोहोचले आणि प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं. त्यामुळे श्रमदान करताना राधिका आपल्यासोबत श्रमदान करतेय म्हणून गावकऱ्यांना वेगळाच हुरूप आला. त्या गावातील लहान लहान मुले माझ्यासोबत काम करत होती, मला शिकवत होती आणि या सगळ्या उत्साहात आम्ही श्रमदानाचे कार्य यशस्वी केले.” Also Read : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकरने खुल्लम खुल्ला केले या अभिनेत्रीला किस