Join us

नील सोडणार ये है मोहोब्बते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:08 IST

ये है मोहोब्बते या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेच्या कथानकाला सध्या बरीच वळणे देण्यात आली आहेत. या ...

ये है मोहोब्बते या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेच्या कथानकाला सध्या बरीच वळणे देण्यात आली आहेत. या मालिकेच्या कथानकासोबतच मालिकेच्या टीममध्येही काही बदल आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत पटनायक या वकिलाची भूमिका साकारणारा अभिनेता नील मोटवानी ही मालिका सोडणार आहे. या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेला दिली जाणारी वळणे त्याला आवडली नसल्याने त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत अवदीप सिद्धू पटनायकची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.