Join us

सोशल मिडियावर हिना खान ठरतेय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 14:08 IST

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षरा अर्थात हिना खान सध्या खूप चर्चेत आहे. एक तर ती लवकरच मालिका ...

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षरा अर्थात हिना खान सध्या खूप चर्चेत आहे. एक तर ती लवकरच मालिका सोडणार असल्याच्या अफवा जोर धरत असतानाच आता दुसऱ्या कारणावरून तिच्याबाबत चर्चा होत आहे. हिना खानच्या चाहत्यांची संख्याही खूप आहे. आपल्याविषयी चाहत्यांना प्रत्येक गोष्ट कळावी या प्रयत्नात हिना असते. हिना खान आणि ब्वॉयफ्रेंड रॉकी जयसवाल यांनी यंदा दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. हे फोटो पाहताच चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमारच केला. मात्र याविषयी काहीही न बोलता तिने फोटो अपलोड करणेच जास्त एन्जॉय केले. यंदाची दिवाळी हिना आणि रॉकी दोघांसाठी खूप खास ठरली, कारण दोघेही लवकरच रेशीमगाठीत अडकणार असल्याचे कळतेय. हिनाने तिचा २९ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. त्यामुळे लग्नानंतर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास आश्चर्य वाटायला नको.