इशानीने घातला आईचा चुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 17:18 IST
हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच तुषार आणि अनोखीचे लग्न पाहायला मिळणार आहे. ...
इशानीने घातला आईचा चुडा
हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच तुषार आणि अनोखीचे लग्न पाहायला मिळणार आहे. सगळ्या समस्यांवर मात करत ते दोघे आता लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी अनोखी म्हणजेच इशानी शर्माची आई सेटवर उपस्थित होती. इशानीच्या आईला आपल्या मुलीला वधूच्या वेशात पाहाण्याची खूप इच्छा असल्याने त्या वेळ काढून हिमाचल प्रदेशवरून मुंबईला आल्या होत्या. एवढेच नव्हे तर इशानीसाठी त्यांनी चुडा म्हणजेच बांगड्यादेखील आणल्या होत्या. इशानीने तिच्या आईने त्यांच्या लग्नात घातलेला चुडा चित्रीकरणासाठी घातला.