Join us  

माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत एंट्री झाल्यानंतर इशा केसकरला करावे लागले हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 2:44 PM

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने आजवर टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांपासून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावते आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. शनाया ही व्यक्तिरेखा या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनीलने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र या मालिकेतून नुकतीच तिने एक्झिट घेतली. या मालिकेत आता शनायाची भूमिका इशा केसकर साकारत आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकीच पसंती देत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने आजवर टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांपासून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, स्वावलंबी राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला बिचारा गुरुनाथ या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. 

इशा केसरकने याआधी जय मल्हार या मालिकेत बानू ही भूमिका साकारली होती. इशाला शॉपिंगची खूप आवड आहे. तिने या मालिकेत नुकतीच रसिकाची जागा घेतली असल्यामुळे आता ती या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेसाठी शॉपिंग करणार आहे. रसिका या मालिकेत वापरत असलेले कपडे इशाला होत नाहीयेत. तरीही सुरुवातीला काही दिवस आधीचे कपडे वापरुन तिने वेळ निभावून नेली. पण आता इशासाठी नवे कपडे आणावे लागले. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढून तिच्यासाठी कपड्यांची खरेदी करणे जोरात सुरू आहे. शनाया तिचे कपडे रिपीट करत नसल्यामुळे एका महिन्यातच इशाने तिच्या व्यक्तिरेखेसाठी जवळ जवळ ५० नवीन कपड्यांचे जोड खरेदी केल्याचे तिने सांगितले. प्रेक्षकांना नव्या शनायाचा लुकही आवडतोय अशी चर्चा आहे. त्यामुळेच मालिकेची टीम तिच्या लूकवर प्रचंड मेहनत घेत आहे. 

 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोईशा केसकर