Join us  

'इंटरनेटवाला लव्ह' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:30 AM

आज, इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे, नाते सुध्दा तुम्ही एका फटक्यात बनवू शकता कारण तुम्ही प्रेमापासून फक्त एका क्लिक इतक्या अंतरावर असता. कलर्सने प्रेक्षकांसाटी एक अनोखी, तरुण व नव्या युगाची प्रेम कथा आणली आहे.

आज, इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे, नाते सुध्दा तुम्ही एका फटक्यात बनवू शकता कारण तुम्ही प्रेमापासून फक्त एका क्लिक इतक्या अंतरावर असता. कलर्सने प्रेक्षकांसाटी एक अनोखी, तरुण व नव्या युगाची प्रेम कथा आणली आहे. त्याच्या नव्या प्रस्तावातून-इंटरनेटवाला लव्ह. जय (शिवीन नारंग) आणि आद्या (तुनिशा शर्मा) हे खडू आणि चीजसारखे आहेत. जय सोशल मीडियावरच खातो, श्वास घेतो आणि जगतो आहे तर आद्या इंटरनेट पासून सावध रहाते आहे आणि तिने सोशल मिडियावरील तिच्या वापरावर बंधने घातली आहेत. या वेगळ्या आणि खेळकर निवेदनातून ही जोडी एकमेकांना भेटल्यावर काय होते हे दाखविले आहे. या शो मध्ये अनेक नामवंत कलाकार आहेत जसे की, मिनिशा लांबा, वरूण बडोला, जयंति भाटिया आणि अनेक प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. स्फिअर ओरिजिनद्वारा निर्मित इंटरनेटवाला लव्हचा शुभारंभ होत आहे 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.00 वाजता फक्त कलर्स वर. 

इंटरनेटवाला लव्ह ही कथा नवी दिल्लीत घडत आहे जेथे प्रमुख पात्र असलेला जय रेडियो स्टेशनवर एक लोकप्रिय आरजे आहे आणि तो इंटरनेटवर नोंद होण्याची गरज असलेल्या वाढत्या जमातीचा एक सदस्य आहे. त्याच्या मते ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग असो किंवा प्रेम असो सर्व काही व प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर होऊ शकते. तर दुसरीकडे आद्या, एक शिस्तप्रिय मुलगी आहे तिचा ऑनलाइन डेटिंगच्या संकल्पनेवर किंवा सोशल मीडियावरील या पर्क्सवर अजिबात विश्वास नाही. ती एका वेडिंग प्लॅनिंग एजन्सी मध्ये काम करते आणि ती चालवत आहे माहिरा (मिनिशा लांबा) जी एक परिपूर्णतवादी असून तिला सर्व गोष्टी तिच्या कलाने झालेल्या हव्या असतात. त्याच्या भूमिके विषयी बोलताना, शिविन नारंग म्हणाला, “जय हा एक स्व‍च्छंदी मुलगा असून तो वर्तमानकाळात जगत आहे. तो अतिशय उत्साही आणि उल्हसित असून अतिशय धाडसी आहे. माझे पात्र सोशल मिडियावर त्याचे जीवन जगत आहे आणि ते मला साकारणे थोडे जड गेले. तसेच आरजेची भूमिका सुध्दा मी प्रथमच करत असून त्यात सुध्दा तुम्ही अतिशय उत्साही असणे गरजेचे असते आणि या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी प्रशिक्षण घेत आहे. मला आशा आहे की या सर्व प्रयत्नांना यश येईल आणि मी आता शो चालू होण्याची वाट पहात  हे.”  तुनिशा शर्माने पुढे सांगीतले, “इंटरनेटचे फायदे आणि तोटेही आहेत, पण माझा विश्वास आहे की नियंत्रणाने सर्व काही व्यवस्थित होते. माझे पात्र असलेल्या आद्या मध्ये तुम्हाला माझ्या काही झलकी पहायला मिळतील, शो ची संकल्पना अतिशय सुंदर आणि सुसंगत आहे. मला आशा आहे की प्रेक्षक आमच्या वर त्यांच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा वर्षाव करतील.”