Join us  

'रामायण'मधील सीताच्या भूमिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, खुद्द सीता उर्फ दीपिका चिखलियाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:34 PM

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा रामायण मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. याकाळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा ऐंशी नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मालिका रामायण दुरदर्शनवर दाखल झाली आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षक खूप खूश आहेत. ऐंशीच्या दशकात ज्यावेळी रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सुरू झाली होती तेव्हा लोक हातातील सगळी कामे बाजूला ठेवून शेजारांच्या टीव्हीवर मालिका पाहण्यासाठी जात होते. सकाळी 9 वाजता सर्व गल्ली सामसूम होत होत्या. पाहिलं तर आज लॉकडाउनमुळे सगळीकडे सामसूम झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रामायण मालिकेचे प्रसारण सुरू केले आहे. या मालिकेचे खूप सारे किस्से आहेत. मात्र आज या मालिकेतील सीतेचा एक मजेशीर किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपल्या सगळ्यांना माहित आहे की काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये रामायणमधील स्टार कास्टने हजेरी लावली होती. त्यावेळी सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने खुलासा केला की कसा तिला ही आयकॉनिक भूमिका मिळाली. दीपिकाने सांगितले की, त्यावेळी रामानंद सागर यांच्या विक्रम और बेताल या मालिकेत ती काम करत होती.

या मालिकेची शूटिंग रामानंद सागर यांच्या बंगल्यावर होत होते. एक दिवस ती त्यांच्या बंगल्यावर पोहचली तेव्हा तिने पाहिले की तिथे खूप लहान मुले आली होती. तेव्हा तिला समजले नाही तिथे काय होत आहे. जेव्हा तिने तिथे एकाला विचारले की, घरात भाभीजीने नर्सरी सुरू केली आहे का? त्यावर तिला त्या व्यक्तीने सांगितले की, रामायणच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे आणि त्यासाठी लव कुशचं कास्टिंग सुरू आहे.

हे ऐकल्यानंतर दीपिकाने विचारले की राम सीताची कास्टिंग झाली का? त्यावर त्या व्यक्तीने सांगितले की नाही, राम सीताची कास्टिंग अजून बाकी आहे. आधी लव कुशची कास्टिंग करत आहोत. एक दिवस दीपिकाला पापा जी (त्यावेळी दीपिका रामानंद सागर यांना पापाजी असे संबोधत होती) यांचा फोन आला आणि ते म्हणाले की, कुडी तू ये, सीतासाठी टेस्टिंग करून घेऊयात. हे ऐकल्यावर मी म्हटलं की, विक्रम बेताल और दादा दादी की कहानियां मध्ये काम करत आहे आणि तरीदेखील तुम्ही माझे सीतासाठी कास्टिंग टेस्ट करत आहात? पूर्णवेळ सेटवर राजकुमारी बनून मी फिरत असते.

माझे म्हणणं ऐकल्यावर पापाजी म्हणाले की, सीता अशी असली पाहिजे की जेव्हा ती स्क्रीनवर दिसेल तेव्हा ही सीता आहे असं सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. लोक सांगतील की ही सीता आहे.

दीपिकाने हेदेखील सांगितले की, त्यानंतर तिचे 4 ते 5 वेळा स्क्रीन टेस्ट झाली आणि अखेर ती थकली. तिने सांगितले की, घ्यायचं तर घ्या नाहीतर नाही घेतलं तरी चालेल. शेवटच्या स्क्रीन टेस्टवेळी मला सांगितले गेले की तुच आमची सीता असशील.

टॅग्स :रामायणकोरोना वायरस बातम्या