Join us  

​इंडियन आयडलची ही पूर्व स्पर्धक बनणार आता इंडियन आयडलची परीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 8:33 AM

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला ...

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. आज हे गायक बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण करत आहेत. या कार्यक्रमातील एक स्पर्धक आता प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला मिळत असल्याने ही गायिका सध्या चांगलीच खूश आहे. नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून  सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. लंडन ठुमके, बद्रिनाथ की दुल्हनिया, मिले हो तुम, मैं तेरा बॉयफ्रेंड यांसारखे एकाहून एक हिट गाणी तिने आजवर गाजली आहेत. काही दिवसांपूर्वी ती सारेगमपा या रिऑलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. एका मुलाखतीत नेहा सांगते, मी एका रिअॅलिटी शोद्वारे आल्यामुळे माझ्यासाठी रिअॅलिटी शो हे खूप जवळचे आहे. मला कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारायला मिळावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. सारेगमपा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे आता तर नेहाने ज्या रिअॅलिटी शो पासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्याच रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसण्याचा मान तिला मिळत आहे. याविषयी नेहा सांगते, इंडियन आयडल हा मंच माझ्यासाठी खूप खास आहे. कारण याच कार्यक्रमापासून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. संगीताच्या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला इंडियन आयडल हा मंच आपलासा वाटतो. या कार्यक्रमात आता एक परीक्षक म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आहे. याचा मला खूपच आनंद होत आहे. नेहासोबतच इंडियन आयडलच्या या सिझनमध्ये अन्नू मलिक, विशाल दादलानी परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Also Read : ​नेहा कक्कर करणार लग्न?