Join us  

Indian Idol 12: आता चाहत्यांना धीर धरवेना; शन्मुखप्रियाला शो बाहेर काढण्याची मागणी थांबता थांबेना...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 2:36 PM

Indian Idol 12: दोन आठवड्यांपासून शन्मुखप्रिया जबरदस्त ट्रोल होतेय. ती ट्रोल झाल्यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायण तिच्या बचावासाठी समोर आला होता.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल’चा हा सिझन चांगलाच वादात अडकला आहे. कधी स्पर्धकांच्या आवाजामुळे तर कधी या कार्यक्रमावर परीक्षकांनी केलेल्या वादामुळे हा कार्यक्रम चर्चेत आहे.

‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) वीकेंड एपिसोड टेलिकास्ट झाला रे झाला की, नवा वाद उभा राहतो. किशोर कुमार स्पेशल एपिसोडचा वाद अद्याप शमला नसताना गेल्या काही आठवड्यांपासून शोची स्पर्धक शन्मुखप्रिया (Shanmukha Priya) ट्रोल होतेय. तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सनंतर तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी होतेय.

दोन आठवड्यांपासून शन्मुखप्रिया जबरदस्त ट्रोल होतेय. ती ट्रोल झाल्यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायण तिच्या बचावासाठी समोर आला होता. या वीकेंडला टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये शन्मुखप्रियाने ‘गुस्ताख दिल’ हे गाणे सादर केले. मात्र तिचा हा परफॉर्मन्सही चाहत्यांना आवडला नाही आणि पुन्हा एकदा तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी झाली. पुन्हा एकदा तिला ट्रोल करत नेटक-यांनी अनेक मीम्स शेअर केलेत.

सोनू कक्करही आली निशाण्यावर

या वीकेंडमध्ये ‘इंडियन आयडल 12’मध्ये नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. (Sonu Kakkar in Indian Idol 12) याचा प्रोमोही रिलीज झाला होता. हा प्रोमो पाहून चाहते संतापले होते. एपिसोड टेलिकास्ट झाला आणि चाहत्यांचा संतापाचा जणू भडकाच उडाला. शोमध्ये सोनू कक्करने गायलेले गाणे ऐकल्यानंतर लोकांनी सोनूला जबरदस्त ट्रोल केले.

शोचा स्पर्धक सवाई भट याने नुसरत फतेह अली खान यांचे गाणे सादर केले. आपल्या परफॉर्मन्सनंतर सवाईने स्पेशल जज म्हणून आलेल्या सोनू कक्करसोबत गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली. सोनू स्टेजवर पोहोचली आणि तिने ‘मेरे रश्के - ए- कमर’ हे गाणे सादर केले. तिचे हे गाणे ऐकल्यानंतर सोनू सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली

टॅग्स :इंडियन आयडॉल