Join us  

Indian Idol 12: 'स्क्रिप्टेड शो आणि सर्व काही फक्त TRPसाठी', सवाई भट शोमधून बाहेर पडल्यानंतर भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 1:33 PM

अंजली गायकवाडनंतर आता या शोमधील सवाई भटचा प्रवास संपला आहे. या धक्कादायक एलिमिनेशनमुळे चाहते नाराज झाले आहेत.

इंडियन आयडॉल १२ शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये नुकतेच एलिमिनेशन झाले ज्यामुळे पुन्हा एकदा शो चर्चेत आला आहे. अंजली गायकवाडनंतर आता या शोमधील सवाई भटचा प्रवास संपला आहे. मोहम्मद दानिश, निहाल टौरो आणि सवाई भटचे नाव डेंजर झोनमध्ये होते आणि या तिघांमधून सवाई भटला शोमधून बाहेर पडावे लागले. चाहते या धक्कादायक एलिमिनेशनमुळे नाराज झाले आहेत.

इंडियन आयडॉल १२च्या रविवारच्या भागात कंटेस्टंट्स फादर्स डेसोबत कल्याणजी आणि आनंदजी स्पेशल सेलिब्रेट करताना दिसले. या भागात लोकप्रिय संगीतकार आनंदजी यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या उपस्थितीत पन्नास-साठ पासून नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यादरम्यान इंडियन आयडॉल १२च्या स्पर्धकांनी दमदार परफॉर्मन्स दिले. मात्र त्यांच्यावर एलिमिनेशनचीही टांगती तलावर होती. पवनदीप राजनला सर्वात जास्त मते मिळणारा स्पर्धक म्हणून घोषित करण्यात आले. मात्र सवाई भटला प्रेक्षकांचे कमी मत मिळाल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

सवाई भटच्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. चाहते इंडियन आयडॉल १२ शो स्क्रिप्टेड आणि पवनदीपच्या बाजूने पक्षपाती असल्याचा आरोप करत आहेत. या शोवर सोशल मीडियावर टीका होताना दिसते आहे. चाहते ट्विटरवर नाराजी व्यक्त करत आहेत.

तसेच हे सर्व टीआरपीसाठी सुरू असल्याचाही आरोप प्रेक्षक करत आहेत.काही लोकांनी सवाईचे एलिमिनेशन अयोग्य असल्याचे म्हटले तर काहींनी पवनदीपला जास्त व्होट मिळणारा स्पर्धक ठरल्यामुळे शंका व्यक्त केली. इतकेच नाही काही लोकांनी शो न बघण्याची शपथ घेतली आहे. 

सवाई भट इंडियन आयडॉलमधील सर्वात चर्चित कंटेस्टंटपैकी एक आहे. जेव्हा तो रिएलिटी शोमध्ये आला आणि त्याची लोकप्रियता वाढली. इतकेच नाही तर अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदादेखील त्याची फॅन आहे.

नुकतेच नव्याने सवाई भटला सपोर्ट करत त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावरदेखील शेअर केला होता.

टॅग्स :इंडियन आयडॉल