Join us

प्रतिमाची डॅशिंग एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 14:46 IST

हमको तुम से हो गया है प्यार क्या करे या मालिकेत लवकरच प्रतिमा काझमीची एंट्री होणार आहे. प्रतिमाने आतापर्यंत ...

हमको तुम से हो गया है प्यार क्या करे या मालिकेत लवकरच प्रतिमा काझमीची एंट्री होणार आहे. प्रतिमाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रतिमा दादाजींची म्हणजेच सुधीर पांडेंच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत ती माताजी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. माताजी अतिशय कठोर आणि कडक स्वभावाच्या आहेत असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत प्रतिमाची एंट्री एकदम धुवाँदार होणार आहे. माताजी घरी आल्याआल्या लगेचच दादाजींच्या श्रीमुखात भडकावून देणार आहे. प्रतिमाने याआधी सिया के राम या मालिकेत काम केले होते.