Join us  

कृष्‍णा भारद्वाज निमिषा वखारियासोबत आहे खास नाते, शेअर केल्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 4:28 PM

आम्‍ही दोघेही आमच्‍या सीन्‍समध्‍ये काहीसा वेगळेपणा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. मला आमच्‍या सीन्‍समध्‍ये असे बदल करायला खूप आवडते.

मालिका 'तेनाली रामा'ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासोबत त्‍यांच्‍या मनामध्‍ये खास स्‍थान देखील निर्माण केले आहे. मालिकेचे कलाकार प्रमोशनल कार्यक्रमासाठी बाहेर जातात, तेव्‍हा त्‍यांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळते. लक्षवेधक पटकथा आणि प्रबळ पात्रांमुळे हे शक्‍य झाले आहे.

मालिकेचे कलाकार त्‍यांच्‍या भूमिकांना खास बनवण्‍यासाठी सर्वोत्तम अभिनय सादर करण्‍याप्रती कटिबद्ध आहेत. वर्षानुवर्षे या मालिकेला खास बनवण्‍याबाबत बोलताना अनेकदा कलाकार म्‍हणतात की,''मालिकेमधील पात्र आणि पडद्यामागे कलाकारांमध्‍ये असलेल्‍या दृढ नात्‍यामुळे हे शक्‍य झाले आहे.'' आणि पडद्यावर देखील त्‍यांचे हे दृढ नाते दिसून येत आहे. पण मालिकेचे सर्वात लाडके पात्र रामा (कृष्‍णा भारद्वाजद्वारे साकारण्‍यात येणारी भूमिका) आणि अम्‍मा (निमिषा वखारियाद्वारे साकारण्‍यात येणारी भूमिका) यांच्‍यामध्‍ये अत्‍यंत खास नाते आहे, ज्‍यामुळे पडद्यावर देखील तीच केमिस्‍ट्री दिसून येते.

निमिषा वखारियासोबतच्‍या नात्‍याबाबत बोलताना कृष्‍णा म्‍हणाला,''मी सेटवर अम्‍माच्‍या खूपच जवळ आहे. ती मालिकेमध्‍ये नसताना देखील मला तिची खूपच आठवण येत होती. अम्‍मा ही रामाच्‍या शरीराचा एक भागच आहे. रामा तिच्‍याशिवाय काहीच नाही. मला वास्‍तविक जीवनात देखील तसेच वाटते. ती माझ्यासाठी आईसारखीच आहे. माझे तिच्‍यासोबत सीन्‍सचे शूटिंग असताना माझा परफॉर्मन्‍स आपोआपपणे उत्तम होतो. पडद्यामागे देखील आमच्‍यामध्‍ये दृढ नाते आहे, जे आमच्‍या परफॉर्मन्‍समध्‍ये देखील दिसून येते. आता शूटिंग थांबलेली असल्‍यामुळे ती घरामधून माझ्यासाठी आणणा-या खाद्यपदार्थांची मला खूप आठवण येत आहे.''  

याबाबत बोलताना निमिषा वखारिया म्‍हणाली,''तेनाली रामा मालिकेमध्‍ये परतल्‍याने माझा मुलगा रामासाठी घरी परतल्‍यासारखे वाटत आहे. मला कृष्‍णासह परतल्‍याने खूप आनंद झाला. आमच्‍यामध्‍ये खूप चांगली केमिस्‍ट्री आहे. तो रामाची भूमिका साकारत असताना माझ्यामध्‍ये आपोआपपणे मातृत्‍वाची भावना निर्माण होते. आम्‍ही दोघेही आमच्‍या सीन्‍समध्‍ये काहीसा वेगळेपणा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. मला आमच्‍या सीन्‍समध्‍ये असे बदल करायला खूप आवडते. मला माहित आहे की, मी त्‍वरित काहीतरी वेगळेपणा आणला तर त्‍याबाबत त्‍याचे काहीच म्‍हणणे नसते. आम्‍ही एकत्र बसून आमच्‍या परफॉर्मन्‍सेसबाबत गप्‍पा मारतो आणि एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकण्‍याचा प्रयत्‍न करतो. याच सुसंगतेमुळे पडद्यावर अभिनय साकारताना काहीशी जादू आणण्‍यामध्‍ये मदत होते.''   

टॅग्स :तेनाली रामा