Join us  

'इंडियन आयडॉल 12'च्या मंचावर साजरी करण्यात आली इफ्तारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 3:28 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या शोचा होस्ट आदित्य नारायण आपल्या गंमती जमती घेऊन परतणार आहे. शोमध्ये संगीतकार अन्नू मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर हजेरी लावणार आहेत.  दानिशने ‘अय मेरी जोहराजबीं’ आणि ‘चाहुंगा मैं तुझे सांझ सवेरे’ या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. दानिश मोहम्मदने आपल्या गाण्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. परीक्षक आणि सगळ्या स्पर्धकांनी त्याला उभे राहून दाद  दिली.  त्यातर त्या सगळ्यांनी एकत्र इफ्तारीचा आनंद लुटला. दानिश पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांपासून दूर इफ्तारी साजरी करत होता. 

 आदित्यने दानिशला विचारले की, त्याला तिच्या कुटुंबाची आज इतकी आठवण का येत आहे, यावर दानिशने उत्तर दिले, “आमच्यासाठी रमझान हा दर वर्षी खूप खास प्रसंग असतो, पण यावेळेस मी त्यांच्यासोबत इफ्तारी करू शकत नसल्याने आज मला त्या सगळ्यांची खूप आठवण येत आहे.” याला पुस्ती जोडत मनोज मुंतशिर म्हणाला, “दानिश आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि आज या प्रसंगी तुझ्यासाठी एक सर्प्राइज आहे.” त्यानंतर आपल्यासाठी मंचावर इफ्तारीची व्यवस्था पाहून दानिश भारावून गेला. मागाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. सगळ्यांचे हे वर्तन बघून दानिश भावुक झाला, त्यावर अन्नू मलिक म्हणाला, “दानिश तू म्हणजे हिरा आहेस. तू मंचावर अद्भुत परफॉर्म केलेस. आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि या प्रसंगी मी माझ्याकडून तुला भरभरून आशीर्वाद देतो. 

टॅग्स :इंडियन आयडॉल