Join us  

"मी आज काही आहे ते केवळ रेमोमुळे"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 2:04 PM

हाय फिव्हरच्या या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असलेले सलमान युसूफ खान यांनी त्याचा मेंटॉर, मार्गदर्शक रेमो डिसुजाचा आवाज ऐकला आणि गे खास भागातले वातावरण अगदीच भावनापूर्ण झाले.

गेल्या आठवड्यात &TV वरील हाय फिव्हर... डान्स का नया तेवर या शोच्या व्यासपिठाने केवळ उत्कृष्ट परफॉर्मन्स पाहिले नाहीत, तर काही भावूक क्षणही अनुभवले. स्पर्धक असोत वा परीक्षक, जुन्या आठवणींना उजाळा देऊन या शोमधील प्रत्येकाने या व्यासपिठावर भावनिक वातावरण तयार करण्यात हातभार लावला आहे. हाय फिव्हरच्या या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असलेले आणि पूर्वी स्पर्धक म्हणून लोकांसमोर आलेले सलमान युसूफ खान यांनी त्यांचे मेंटॉर, मार्गदर्शक रेमो डिसुजाचा आवाज ऐकला आणि गेल्या आठवड्यातल्या खास भागातले वातावरण अगदीच भावनापूर्ण झाले.

सलमान आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य असल्यासारखी भावनिक जवळीक साधणाऱ्या रेमो यांनी रिअलिटी शोमधील त्याच्याशी असलेल्या घट्ट ऑनस्क्रीन नात्याबद्दल सांगितले. या दोघांमध्ये गेली अनेक वर्षे ऑफस्क्रीन नातेही तितकेच घट्ट असून रेमो आता सलमानचा मोठा चाहता झाला आहे. रेमोचा आवाज गेल्या भागात ऐकल्यानंतर, जुन्या आठवणींनी भारवलेल्या सलमाननी रेमोसोबत असलेले बंधुत्वाचे नाते व्यक्त केले. “मी माझ्या आयुष्यात निराश आणि हतबल होतो, तेव्हा सर्व बाबतीत व सर्वच मार्गांनी मला मदत करण्यासाठी केवळ एका फोनवर रेमो सर हजर व्हायचे. मी जेव्हा डान्स रिअलिटी शो जिंकलो, तेव्हा माझी खरी ओळख तयार झाली. बॉलिवूडमधली काही मोजकी मोठी कलाकार मंडळी मला ओळखत होती. त्यानंतर पुन्हा मला अपयश आले, तेव्हा रेमो सर माझ्या पाठीशी उभे होते. मला त्यांनी रहायला घर दिले. त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे माझे रक्षण केले. इतकेच नव्हे, तर चित्रपटात दिग्दर्शनासाठी त्यांचा सहाय्यक बनण्याची संधी दिली. रेमो सर हा माझा कणा आहेत. आज मला त्यांच्याकडून फक्त प्रेम आणि आदर हवा आहे, जो मी मरेपर्यंत पुरेसा ठरेल.’’

या इंडस्ट्रीत येण्यासाठी अहमद खान यांनी मदत केल्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत, असे खुद्द रेमोने सांगणे हे अहमद खान यांच्यासाठी मोठे सरप्राइज होते. त्यांच्यातील नाते विषद करताना रेमो यांनी आपल्या गुरूसाठी एक भावनिक संदेश दिला. रेमोचे शब्द ऐकून निःशब्द झालेले अहमद म्हणाले, “स्वतःच्या कामासाठी रेमो कधीही क्रेडीट घेणार नाही. तो खूप चांगला माणूस आहे, म्हणून ७ उत्कृष्ट नर्तकांमध्ये रेमोची निवड केल्याचे मला आठवते. आजवर कुणीही त्याला थांबवू शकलेले नाही, यापुढे कुणीथांबवू शकणार नाही.’’