कैसी ये यारिया हा कार्यक्रम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:58 IST
२०१४ मध्ये एक शो तरुणांमध्ये चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाचे ३०० हून अधिक भाग पूर्ण झाले होते. पण या ...
कैसी ये यारिया हा कार्यक्रम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस
२०१४ मध्ये एक शो तरुणांमध्ये चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाचे ३०० हून अधिक भाग पूर्ण झाले होते. पण या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. यात पार्थ समथान, निती टेलर, उत्कर्ष गुप्ता, विभा आनंद, क्रिष्णन बेरॅटो, चार्ली चौहान, अभिषेक मलिक यांच्या मुख्य भूमिका होत्या. या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली बातमी आहे. तरुणाईंचा लाडका कार्यक्रम कैसी ये यारिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला जावा अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून या कार्यक्रमाचे फॅन्स करत होते आणि त्यामुळेच हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे या कार्यक्रमाच्या टीमने ठरवले आहे. या कार्यक्रमाचा हा तिसरा सिझन असून या कार्यक्रमाच्या या नव्या सिझनमध्ये नीती टेलर आणि पार्थ समाथान हे पुन्हा एकदा रोमान्स करताना आपल्याला दिसणार आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी या दोघांनीही एका व्हिडिओद्वारे हा शो पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. एमटीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या या शोचा तिसरा सिझन मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. नीता आणि पार्थने शेअर केलेल्या या व्हिडिओत या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या व्हिडिओला मिळत आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने या कार्यक्रमाचे चाहते खूप खूश असल्याचे त्यांनी प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे.कैसी ये यारिया हा शो तरूणांमध्ये चांगलाच गाजला होता. शहरातील एका मोठ्या कॉलेजमध्ये पाच मित्र मिळून एक म्युझिकल बॅंड सुरू करतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे मतभेद, प्रेमभंग आणि अनेक हलक्या फुलक्या गोष्टी प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या होत्या. या कार्यक्रमातील माणिक आणि नंदिनीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या शोचा दुसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बीबीसी वर्ल्डवाईड इंडियाची निर्मिती असलेला या शोचे शूटिंग सध्या सुरू असून लवकरच तो वूट या वायकॉम18 च्या अॅपवर दाखवला जाणार आहे.Also Read : गुलाम या मालिकेतून नीती टेलरला मिळणार डच्चू?