होमवर्क जरूरी है
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:54 IST
मयांक गांधीने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता काला टीका या मालिकेत तो एका गतिमंद मुलाची भूमिका साकारणार ...
होमवर्क जरूरी है
मयांक गांधीने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता काला टीका या मालिकेत तो एका गतिमंद मुलाची भूमिका साकारणार आहे. काला टीका या मालिकेद्वारे समाजात असलेल्या अंधश्रद्धांवर भाष्य केले जाते. मयांकची या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. प्रचिती मिश्रा या मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी मयांक सांगतो, "माझ्यासाठी ही भूमिका अतिशय आव्हानात्मक होती. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी अशाप्रकारच्या भूमिका असणारे अनेक चित्रपट पाहिले. ईश्वर या चित्रपटात अनिल कपूर यांनी साकारलेली भूमिका मला खूपच आवडते. माझीदेखील ही भूमिका प्रेक्षकांनी पसंत करावी अशी माझी इच्छा आहे."