Join us  

ही असणार ‘नच बलिये’ कार्यक्रमातील पहिली सेलिब्रेटी जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 7:04 PM

‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देनच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार आहे.

‘स्टार प्लस’वरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी कार्यक्रम ‘नच बलिये’ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा झळकणार असून या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमात नेहमीच बॉलिवूड, टिव्ही आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्या आपल्या नृत्याने प्रेक्षकांना प्रभावित करतात. या सिझनमध्ये देखील अनेक प्रसिद्ध जोड्या सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आठवड्यांमागून आठवडे वेगवेगळे प्रकारची नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांचे भान हरपणार यात काहीच शंका नाही. 

‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार आहे. हिनाला स्टार प्लसवरीलच ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली होती. आता ती पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये झळकण्यास सज्ज झाली आहे.

स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत एकत्र काम करत असताना हिना आणि रॉकी एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर रॉकीने टीव्हीवरच हिनाला लग्नाची मागणी घातली होती. सध्या ती कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका ही खलनायकाची भूमिका रंगवत आहे. आपल्या मादक रूपाने तिने मालिकेत एक ग्लॅमर आणले आहे.

नच बलिये कार्यक्रमाचे आतापर्यंतचे आठ सिझन यशस्वीपणे पार पडले असून आता या कार्यक्रमाचा नववा सिझन लवकरच स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात टीव्हीवरील लोकप्रिय कलाकारांच्या जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होत असतात आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार हे परीक्षकाचे काम बघतात.

आता हिना आणि रॉकी यांच्यातील प्रेमाचे अनुबंध ‘नच बलिये’च्या नवव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नच बलिये लवकरच स्टार प्लसवर सुरू होणार आहे.  

टॅग्स :हिना खान