Join us

​हिमेश रेशमियाने सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील जयाशला केले साइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:44 IST

सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात सध्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या मधुर आवाजांनी लहान मुले ...

सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात सध्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या मधुर आवाजांनी लहान मुले प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.या कार्यक्रमात नेहा कक्कर, जावेद अली आणि हिमेश रेशमिया परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. तर आदित्य नारायण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या स्पर्धकांमधील पाच वर्षीय जयेश तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. त्याने आतापर्यंत केवळ प्रेक्षकांचे नव्हे तर परीक्षकांचेदेखील मन जिंकले आहे. जयाश हिमेश रेशमियाचा तर प्रचंड लाडका आहे. त्याचा आवाज हा खूप चांगला असून त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे हिमेशचे म्हणणे आहे. हिमेश जयाशच्या आवाजाच्या प्रेमात आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण जयाशने त्याला आता एक गाणे गाण्याची ऑफर दिली आहे. नुकत्याच झालेल्या भागात जयाशने अख्खी हनुमान चालिसा म्हणून दाखवली. इतक्या लहान वयात कोणीही हनुमान चालिसा म्हणणे हे खूपच कठीण आहे. पण जयाशने एकही चूक न करता ती एका श्वासात म्हटली. ते पाहून सगळेच थक्क झाले होते. जयाशची स्मरणशक्ती चांगली असून कोणतेही गाणे तीन-चार वेळा ऐकले की ते लगेचच त्याला पाठ होते असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. त्याच्या या परफॉर्मन्सवर हिमेश प्रचंड खूश झाला आणि त्याने काहीच क्षणात जयाशला आपले एक गाणे गाण्याची ऑफर दिली. एवढेच नव्हे तर या गाण्याची साइनिंग अमाऊंटदेखील त्याने जयाशला दिली. जयाशनेदेखील ही घेऊन लगेचच त्याच्या आईकडे सुपूर्त केली.