हाय फिव्हर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार प्रियांशू जोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:34 IST
&TV वर हाय फिव्हर...डान्स का नया तेवर हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या ...
हाय फिव्हर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार प्रियांशू जोरा
&TV वर हाय फिव्हर...डान्स का नया तेवर हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लारा दत्ता, अहमद खान आणि डॅना अलेक्सा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. बडे भैय्या की दुल्हनिया या मालिकेत प्रियांशू जोराने अभिषेकची भूमिका साकारली होती. तसेच तू मेरा हिरो मधील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. हाय फिव्हर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमाद्वारे प्रियांशू जोरा पुनरागमन करत आहे. या कार्यक्रमात तो एका नव्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा हा नवा अवतार प्रेक्षकांना आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. प्रियांशू या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारत आहे. कोणत्याही रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.प्रियांशूच हाय फिव्हर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमासाठी योग्य असल्याची या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना खात्री असल्याने त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रियांशूला विचारले आणि प्रियांशूने देखील या कार्यक्रमासाठी त्यांना होकार दिला. प्रियांशूचे व्यक्तिमत्त्व हे आकर्षक असल्याने तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडू शकेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. आई-मुलगी, वडील-मुलगा, पती-पत्नी, गुरू-विद्यार्थी अशा अनेक जोड्या या कार्यक्रमात नृत्य सादर करताना आपल्याला दिसणार आहेत. या कार्यक्रमाविषयी प्रियांशू सांगतो, “मी कधीच कोणत्या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले नव्हते. त्यामुळे मला नेहमीच रिअॅलिटी शोचे निवेदन करायचे होते. या कार्यक्रमामुळे मला परीक्षक आणि स्पर्धकांसोबत खूप छान संवाद साधता येणार आहे. मी कॉलेजमध्ये असताना निवेदन करायचो. त्यामुळे मी एखाद्या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करावे अशी माझ्या पालकांची देखील इच्छा होती. हाय फिव्हर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमामुळे काही डान्स स्टेप्सदेखील मला शिकायला मिळतील अशी मी आशा करतो.”Also Read : लारा दत्ता हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या कार्यक्रमात झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत